शिवसेनेत फूट पडल्यानंतर शरद पवार भाजप सोबत येणार होते :- गिरीश महाजन

नाशिक:- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रविवारी कोल्हापूर मध्ये उत्तर दायित्व सभा झाली. या सभेत अजित पवार यांनी उद्धव ठाकरे याचं सरकार ज्या दिवशी पडत होत. त्याचवेळेस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्वच्या सर्व आमदारांनी, मंत्र्यांनी एक पत्र तयार केल आणि नेत्यांना दिल की महायुतीमध्ये सामील व्हा हे खोट आसल तर राजकारणा निवृत्त होईल. आस वक्तव्य अजित पवार यांनी केल या वक्त्याव्याला पाठींबा देत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितले की, ही वस्तुस्थिती आहे, 2014 ते 2019 शरद पवार यांनी आम्हाला पाठिंबा दिला नाही का? शिवसेना जेव्हा नाटक करायला लागली होती पवार साहेबांनी सांगितलं होतं तुम्ही काळजी करू नका आम्ही पाठीशी आहे. तेव्हा 2019 मध्ये निवडणूक झाल्यावर शरद पवारांनी चार चार वेळा दिल्लीत मिटींग केल्या होत्या. त्यावेळी अजित दादा गेले ही आमची खेळी होती. ते आमच्या सोबत होते असा त्यांचा मानस होता. परंतु त्यांनी आम्हाला गाफील ठेऊन खरी गुगली टाकली घात करायचा ही त्यांची परंपरा आहे. अजित पवार म्हणताय ते 100 टक्के खरं आहे 2014 साली शरद पवारांनीच आम्हाला उघड पाठिंबा दिला. त्यांनी सांगितलं म्हणून तर आम्ही दावा केला होता. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. दिल्लीत जाऊन किती वेळा बैठका झाल्या आमच्या नेत्यांसोबत त्यांनी मंत्रिपदाच्या पालकमंत्री पदाच्या वाटाघाटी केल्या. आणि आता काय ते नाही म्हणता दादा म्हणताय ते खरं आहे. अजितदादा देखील त्या बैठकीला उपस्थित होते हे शरद पवार नाकारू शकत नाही असं गिरीश महाजन यांनी म्हंटल आहे. शरद पवार यांनी जी 20 वर टीका केल्यासंदर्भातही गिरीश महाजन यांनी शरद पवारांचा समाचार घेतला आहे. मग काय आता त्यांना केळीच्या पानावर जेवायला द्यायचं शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी  आपला देश विश्वगुरू होण्याच्या मार्गावर आहे लक्षात घ्याव  सोन्याच ताट कोणी जेवायला ठेवतं का? सध्या शरद पवार यांच्या मागे कोणी नाही म्हणून ते अस्वस्थ आहेत ते आता बेरक स्टेटमेंट द्यायला लागले आहेत. त्यांच्याकडे कोणी जायला तयार नाही तर हे काय घेतील आस गिरीश महाजन यांनी म्हंटल आहे.