खेळता खेळता अचानक बेशुध्द झाली आणि मग..दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत

दिवसेंदिवस लहान मुलांची काटेकोरपणे काळजी घेणे किती महत्वाची आहे, याची जाणीव करून देणाऱ्या घटना वाढत चालल्या आहे. खेळता खेळता लहान मुलं धोकादायक ठिकाणी जाऊ शकतात, विजेच्या उपकरणांशी त्यांचा संपर्क येऊ शकतो किंवा विषारी पदार्थ त्यांच्या हातात लागला तर होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागत नाही. अशीच एक घटना समोर येत आहे. या घटनेत दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला आहे. ही घटना नागपूर मधील असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दीड वर्षाची चिमुकली बेडरूम मध्ये खेळत असताना तिला मच्छर मारण्याच्या औषधाची बाटली मिळाली. खेळत असताना लहान मुलं वस्तू तोंडात घालतातच त्याच प्रकारे तिने ती बाटली तोंडात घातली. यानंतर ती बेशुध्द पडली. थोड्या वेळाने त्या ठिकाणी रूम मध्ये चीमुकलीची आई आली. आईने मुलीला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र ती उठेना त्यामुळे आई घाबरली. नेमकं काय झाले हे तिला माहितीच नव्हते. तात्काळ चिमुकलीला रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. तपासणीत हा सर्व प्रकार समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यासोबतच लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दीड वर्षाच्या चिमुकली खेळत असताना तिच्या हाती मच्छर मारण्याचे औषधाची बाटली लागली. आपल्या हातात जी बाटली आहे ती तोंडात घटल्याने काय होईल याचे परिणाम त्या लहान जीवाला माहित नव्हते. त्यातच तिने ती बाटली तोंडात घातली आणि विषारी औषधामुळे तिला जीव गमवावा लागला. ही घटना नागपूर मधील असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही अत्यंत दुर्दैवी घटना असून लहान मुलांवर लक्ष देणं किती गरजेचं आहे हे या घटनेतून स्पष्ट होत आहे. आपले पाल्य घरात असो किंवा घराबाहेर असो ते धोकादायक वस्तूंच्या संपर्कात येऊ नये याची काळजी घ्यावी, असंच संदेश या माध्यमातून पालकांना मिळत आहे. विषारी औषध, विजेच्या उपकरणांशी किंवा इतर धोकादायक वस्तू त्यांचा संपर्क येऊ नये ही पुरेपूर जबाबदारी पालकांची असते. लहान मुलं अत्यंत अस्थिर असतात. त्यामुळे त्यांच्या लहान-मोठ्या हालचालींवर आणि ते ज्या ठिकाणी जातात त्या जागेवर लक्ष देणे महत्त्वाचं आहे. लहान मुलांना बाहेर घेऊन जात असताना किंवा घरात असताना देखील त्यांची योग्य देखरेख झालीच पाहिजे.