शिवसेना नेत्या पेडणेकर ऑन फायर; नवनीत राणांवर जहरी टीका

शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांची शिंदे-भाजपसह नवनीत राणा यांचा चांगलाच समाचार घेतला असून त्यांचावर जहरी टीका केली आहे. प्रभादेवीच्या प्रकरणावर न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे प्रभादेवी राडा प्रकरण हे चांगलेच तापले असून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरु आहे.

एकनाथ शिंदे शब्द फिरवणारे झाले

एकनाथ शिंदे यांचा मी बऱ्याचदा अनुभव घेतलाय. आम्ही मानतो, तुम्ही शब्द पाळणारे आमचे कट्टर शिवसैनिक आहात, असे त्या म्हणाल्या. पण आता मात्र तुम्ही शब्द फिरवणारे झाले आहात, अशी खंतही त्यांनी पुढच्या वाक्यात व्यक्त केली.

नवनीत राणांवर बोलणार नाही

नवनीत राणांवर टीका करताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ज्या मुलीनी १३ व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमधून प्रसिद्धी केलीय. तिच्यावर आम्ही घरंदाज बायका त्यावर बोलणार नाहीत. असे बोलून पेडणेकरांनी नवनीत राणा यांच्यावर जहरी टीका केली आहे.

भाजप प्रदेशअध्यक्ष यांची पुन्हा कुळे काढली

आगामी निवडणुकीत शिवसेना उरणार नाही, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. यावर प्रतिक्रिया देताना किशोरी पेडणेकर यांनी, ‘ कुणीही 52 असले म्हणून काही चालत नाही, मात्र (डोक्याकडे हात दाखवत) याच्यात असावे लागते. असा समाचार त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा घेतला आहे.

प्रभादेवी राडा प्रकरण

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या मुलाने गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात येतोय. शिंदे गटाचे अनेक आमदार कुणी हातपाय तोडण्याची, तर कुणी तंगडे तोडण्याची भाषा करतायत, त्याविरोधात आम्ही पोलिसांना भेटणार असल्याचे किशोरी पेडणकर यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांची कार्यपद्धती राबवावी, असे निवेदन आम्ही देणार आहोत असेही त्या म्हणाल्या.