‘अंगावर आले तर शिंगावर’ घेण्याची शिवसेनेची स्टाईल

सध्या कोकणात शिवसेनेच्या ठाकरे गट आणि भाजपमध्ये तणावाचे वातावरण असून अंगावर आल्यानंतर शिंगावर घ्यावाच लागतं ही भूमिका आमची आहे. कुणी अंगावर आला तर शिंगावर घेऊ असा इशारा उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी विराेधकांना दिला आहे. तसेच नितेश राणे यांना प्रतिउत्तर देत म्हणाले, मी असे म्हणेन की अंदर की बात है, ये राणे कुटुंब हमारेही साथ है असे साळवी यांनी म्हंटले आहे. त्यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.


ग्रामपंचायत निवडणुकीत कोकणाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बालेकिल्ला कायम राखल्याबद्दल आमदार साळवींनी विविध ग्रामपंचायतीस भेट देत मतदारांचे आभार मानले. तसेच त्यांनी पत्रकारांशी संवाध साधला असता, ते म्हणाले, देश स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्रातील जनतेने राज्याची वाटचाल पाहिली आहे. या वीस वर्षात राजकीय स्थितीतून आराेप प्रत्याराेप करणं हे सगळं चुकीच्या पद्धतीने चालले आहे. 

राजन साळवी म्हणतात राणे आमच्या सोबत

आमदार साळवी म्हणाले नितेश राणे हे आमचे विरोधक आहेत. राणे कुटुंब हे बाळासाहेबांच्या वलयामुळे मोठे झाले. त्यांनी माझ्यावर आराेप करणे हे चुकीचे आहे. मी पक्षप्रमुखांशी, पक्षाशी किती एकनिष्ठ आहे हे त्यांनी सांगणे गरजेचे नाही. मी असे म्हणेन की अंदर की बात है, ये राणे कुटुंब हमारेही साथ है असे साळवी यांनी म्हंटले आहे.

भास्कर जाधव हे शिवसेनेचे आक्रमक नेते आहेत. जे त्यांच्या मनात, हृदयात तेच त्यांच्या ओठावर येते. भास्कर जाधव यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा उत्तर देण्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते सक्षम आहेत असेही साळवींनी सांगितले.