धक्कादायक ! गंगापूर रोडची हत्या चोरीच्या माल वाटपातून ?

नाशिक | नाशिकच्या गंगापूर Gngapur पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी झालेल्या हत्येचा तपास पोलिसांकडून चालू असून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित आरोपीने आपल्या साथीदाराची हत्या चोरीचा Theft माल वाटपातून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे .असे असलेतरी बुधवारी झालेल्या पगारेच्या हत्ये माघे अजून काही कारण आहे का याबत पोलिस police अधिक तपास करत आहेत

बुधवारी सकाळी गंगापूर राेडवरील ध्रूव नगरकडे Dhruv Nagar जाणाऱ्या कॅनॉलरोडवर ही घडली होती.रस्त्यालगत थांबून चोरीचा माल वाटप करण्यावरून या चौघांमध्ये शाब्दीक वाद सुरू झाला. याच दरम्यान पवनने अतुलच्या दुचाकीची Two-wheeler चावी काढून घेतली हाेती. यावेळी दोघांमध्ये शिवीगाळ सुरू झाल्याने अतुलने पवनच्या डोक्यात दगड Stone घालून व चाकूने वार करुन खून केल्याची प्राथमिक Primary माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली होती. चोरीचा माल वाटपावरून हा वाद Argument झाला आणि त्यातून ही हत्या झाल्याचे समोर आले आले असलेतरी अजून काही कारण असू शकते का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

खून Murder करुन पळणाऱ्या अतुल अजय सिंग २१, रा. सातपुर satpur कॉलनी, नाशिक या संशयीतास गंगापूर पाेलिस ठाण्याच्या महिला पाेलिस अंमलदार शारदा खैरनार यांनी जीवाची बाजी लावून पाठलाग करत पकडले होते. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या संशयीताकडून माहिती Information घेण्याचे काम पोलीस करीत असून पोलिसांच्या तपासा अंती या हत्ये मागील कारण लवकरच समोर येणार आहे.या गुन्ह्याचा तपास संशयिता भाेवती केंद्रित केला असून गुन्ह्याची उकल करतांना आता गुन्ह्यातील साखळी आणि आणखी धागे दोरे मिळवण्यासाठी पवन आणि अतुलच्या अन्य दाेघा साथीदारांचा तपास Investigation पोलिसांकडून केला जात आहे.

पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह !
नाशिक nashik शहरात गेल्या काही दिवसांपासून कायदा व सुवेवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून शहरात दोन आठवड्यात सात हत्या ,हाणामारी ,वाहने चोरी ,लूटमार ,चेन स्नॅचिंग ,Chain snatching घरफोडी अश्या घटना घडत असल्याचे रोजच कानावर येत असल्याने आता नाशिककर नागरिक मोठ्या दहशतीखाली वावरत आहेत.त्यामुळे आता पोलिसांच्या police कामगिरीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे