Skip to content

नाशिक तक

  • होम
  • नाशिक न्यूज
  • क्राइम
  • राजकारण
  • शेअर मार्केट
  • स्पोर्ट्स
  • हेल्थ
  • धार्मिक
  • शेती
  • Web Stories

धक्कादायक..! नाशकात पुन्हा मनपा अधिकारी सायबर क्राईमच्या विळख्यात

सप्टेंबर 16, 2022 Follow On

नाशिकमध्ये सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे महापालिकेचे आयुक्त आणि अधिकाऱ्यांना देखील सायबर गुन्हेगारांकडून टारगेट केलं जात आहे. याआधी महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांचं नाव वापरून व्हाट्सअप द्वारे पैसे मागण्याचा प्रकार घडला आणि आता महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे यांचं इंस्टाग्राम अकाउंटच हॅक करण्यात आलं आहे. डॉक्टर नागरगोजे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून त्यावर पैसे मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रारी केली आहे. मात्र अशा प्रकारे अधिकाऱ्यांच्या नाव वापरून होत असलेले सायबर गुन्हे चिंतेची बाब आहे.

गेल्या महिन्यामध्ये नाशिक विभाग आयुक्त राधाकृष्ण गमे तसेच नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार यांच्या नावाने व्हाट्सअपद्वारे पैसे मागण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्या बाबतीत असाच प्रकार घडला आहे. इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून त्यावरून फ्रेंड लिस्ट मधील व्यक्तींकडून पैसे मागण्याचे प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी हे अकाउंट बंद केले आहे आणि नागरिकांनी कोणत्याही प्रकारे पैसे देऊ नये असे आवाहन देखील केले आहे.

आधी मनपा आयुक्त डॉ. पुलकुंडवार : भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या नावानेच अशा प्रकारे व्हॉट्सअ‌ॅप हॅक करून फसवणुकीचे प्रकार घडत आहे. ही धक्कादायक बाब आहे. यावर वेळीच उपाययोजना होणं आवश्यक आहे. आधी मनपा आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या नावाने महापालिकेतील अधिकारी व त्यांच्या मित्रांना कॉल येऊन पैशांची मागणी केली गेली. त्याचबरोबर संदेशाद्वारे मी अडचणीत असून तातडीने पैसे पाठवून मदत करण्यास सांगितले होते. हा प्रकार समोर येताच डॉ. पुलकुंडवार यांनी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यंच्याकडेच तक्रार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, ज्या मोबाइल क्रमांकावरून कॉल व संदेश आले, त्याची चौकशी करताच तो मोबाइल क्रमांक मंचरमधील व्यक्तीचा असल्यचं निष्पन्न झालं होतं.

विभागीय आयुक्त गमे यांचेही व्हाट्सअप हॅक : त्यापाठोपाठ विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याही व्हाट्सअप अकाउंटवरून पैशांची मागणी होत असल्याचा प्रकार घडला. त्यांनी स्वत:हून शासकीय अधिकारी व त्यांच्या नातेवाईकांना कळविले होतं की, त्यांचे छायाचित्र असलेला डीपी ठेवून एका मोबाइल क्रमांकावरुन व्हॉट्सअ‌ॅप अकाऊंट तयार करण्यात आले आहे. या मोबाइल क्रमांकावरुन अधिकाऱ्यांना किंवा कुणाला संदेश आला तर नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करावे, कोणीही कसलेही पैसे अथवा काहीही मदत करू नये. असे संदेश आले तर लागलीच सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी. अशात आता पुन्हा डॉक्टर नागरगोजे यांच इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून त्यावर पैसे मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Categories क्राइम, ताज्या बातम्या
धक्कादायक! अल्पवयीन मुलीचे आधी अपहरण नंतर बलत्कार
मनसेची ‘५० खोके’ स्पर्धा; सामान्यांना पाहता येणार, काय झाडी, काय डोंगर, शिंदेना डिवचले

Latest News

आदिवासी संघटना आक्रमक, घोटीसह नांदगाव मध्ये रास्ता रोको.

गणरायाच्या मिरवणुकीला गालबोट, गोदावरीत दोघेजण वाहून गेले

मुंबईत जागा नाकारली, मुंबई नेमकी कोणाची?

पहिल्या हरितक्रांतीचे जनक ‘डॉ. एम. एस. स्वामीनाथन’ काळाच्या पडद्याआड

नाशकात लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तगण सज्ज

गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला निफाड मध्ये दुर्दैवी घटना.

About Nashik Tak

Get latest and Breaking News on Politics, Business, Lifestyle, Entertainment and Sports along with News updates from around the india. Also, find English News, live coverage on Bollywood, Cricket, Technology, Celebrities and more on nashiktak.com

Top Categories

क्राइम

राजकारण

ताज्या बातम्या

शेअर मार्केट

Site Links

About Us

Web Stories

Contact Us

© NashikTak | All rights reserved.

Privacy Policy | Terms and Conditions

Design and Developed by Ninja Web Coders