मद्य तस्करीसाठी लढवली अजब शक्कल; पाहून पोलीसही हैराण

नाशिक : अवैध मद्य तस्करीच्या अनेक घटना नाशिकमधून समोर आल्या आहेत. यामध्ये भर पडत असून अजब प्रकारे मद्य तस्करीचा प्रकार समोर आला आहे. एखाद्या चित्रपटात दाखवतात अगदी तशाच प्रकारे अजीब शक्कल लढवत मद्य विक्रीचा प्लान या घटनेत संशयिताने आखला होता. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करत त्याचा हा प्लान फ्लॉप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कळवण-दिंडोरीरोडवर मद्याची चोरून वाहतूक करणाऱ्या मद्य तस्कराला ताब्यात घेत ताच्याकडील मद्य साठा जप्त केला आहे. सदर संशयित पिकअप मधून कळवण-दिंडोरीरोडवर मद्याची चोरून वाहतूक करत होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाला याबद्दल गुप्त बातमी दाराकडून माहिती मिळाली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत या वाहनाला अडवले.

गुप्त माहितीच्या आधारावर कळवण विभाग आणि दिंडोरी भरारी पथकाचे कळवण वणी दिंडोरी रोडवर संशयित वाहनाचा शोध घेतला. त्यानंतर सदर पिकअप वाहनाला थांबवण्यात आले. वाहनाची चौकशी केली असता माहितीनुसार पथकाच्या हाती काहीच लागले नाही. माहिती चुकीची असावी असे देखील पथकाला वाटले. मात्र तरी संशय कायम असल्याने पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वाहनाची कसून पाहणी केली आणि त्यानंतर ही अजीब फिल्मी पद्धतीची मद्य वाहतूकीची घटना उघकीस आली.

हे वाहन इतर वाहनांपेक्षा काहीसे मोठ्या आकाराचे दिसून आले त्यामुळे पथकाचा संशय बळावला होता. पथकाने वाहन चालकाला ताब्यात घेतले आणि वाहनाची पाहणी केली असता ट्रॉलीच्या खाली चोरकप्पा असल्याचे उघडकीस आले. वरची ट्रॉली ढकली असता खालील ट्रॉलीमध्ये विविध कंपनीचे विदेशी मद्याचे बॉक्स असा ९ लाख ४९ हजारांचा मद्यसाठा आढळून आला. अंतर्गत वाहन दाखवायला संशयित टाळाटाळ करत असल्याने पथकाचा संशय वाढला होता. चोरकप्प्यात तब्बल साडेनऊ लाखांचा माल लपवलेला होता. मात्र कोणालाही कळणार नाही असा. संशयिताने लढवलेली शक्कल पाहता त्याने पोलिसांना देखील चुकांडा दिलाच होता. मात्र पथकाच्या हुशारीने चोर उशिरा का होईना पण फसला.

नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अवैध मद्य तसेच इतर अमली पदार्थ वाहतूक विक्रीवर कारवाईचा धडाका सुरु ठेवला आहे. अशात ही पुन्हा एक कारवाई केली असून यात पथकाला यश आले आहे. वाहनासह परराज्यातील विदेशीमद्यसाठा जप्त केला असून सदर वाहनासोबत असलेल्या संशयित इसमाला अटक करण्यात आली आहे.