विद्यार्थ्यांची शिक्षकांना झाडाला बांधून मारहाण; व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल

झारखंडमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शिक्षकांनी कमी मार्क दिले विद्यार्थी नापास झाले म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकांना झाडाला बांधून मारले असल्याची घटना घडली आहे. या खळबळजनक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विद्यार्थ्यांनी हातात दंडुके घेत शिक्षकांना झाडाला बांधून मारहाण केल्याचे त्यात स्पष्ट दिसत आहे.

झारखंडमधील डुमका जिल्ह्यातील एका शाळेतील हा प्रकार असून एका झाडाला शाळेतील तीन शिक्षकाला बांधल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. झाडाला बांधून शिक्षकाला मारहाण केल्याचा हा धक्कादायक व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात असून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

खालील लिंकवर जाऊन तुम्ही तो मारहाणीचा व्हिडिओ पाहू शकतात

https://www.instagram.com/reel/Ch6n1FtggKO/?utm_source=ig_web_copy_link

“मारहाण करतानाचे लाइव्ह चालवा, सर्व देशभर बघुद्या हे सर्व यांना चांगला धडा शिकवू, सर्व काही प्रक्टिकलमुळे झालाय, आमच्या जिंदगी सोबत खेळले आहात, असे विद्यार्थी त्या व्हिडिओ मध्ये बोलताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांनी ३ शिक्षकांना झाडाला बांधले असून नापास झाले याबद्दल जाब विचारताना आणि मारहाण करतानाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नेटकऱ्यांकडून विद्यार्थ्यंवर प्रचंड संताप व्यक्त केला असून शिक्षकांवर काय परिस्थिती ओढवली याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. या व्हिडिओमधील गुंड प्रवृत्तीचे विद्यार्थी शिक्षकाला मारहाण करत आहेत. एक काळ होता जेव्हा विद्यार्थी आपल्या शिक्षकाकडे मान वर करून बघायला घाबरत असत पण आत्ता शिक्षकावर आलेली ही वेळ खूप धक्कादायक आहे. दिवसेंदिवस गुंडगिरी, दादागिरी वाढत चालली असून याचा सामान्य माणसांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.