नाशकात ऊसतोड बंद आंदोलन; साखर कारखान्यावर धडकले शेतकरी

By : Pranita Borse

नाशिक : आज जिल्ह्यातील कादवा सहकारी साखर कारखान्यावर (Kadwa Cooperative Sugar Factory) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा निघाला होता. कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप (State President of Swabhimani Sandeep Jagtap) यांच्या नेतृत्वात ऊस बंद आंदोलन करण्यात आले होते. संदीप जगताप यांच्या नेतृत्वात ऊस रोखण्यात आला होता. संपूर्ण राज्यामध्ये स्वाभिमानीच्या नेतृत्वामध्ये ऊसतोड बंद आंदोलन पुकारण्यात आलं होते. नाशिक जिल्ह्यात या आंदोलनाला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा दावाही आंदोलकांनी केला आहे.

संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाच्या वजनात काटेमारी केली जात असल्याचा आरोप करत या काटेमारीच्या विरोधामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आवाज उठवला. महाराष्ट्रातील संपूर्ण साखर कारखान्यांचे काटे हे ऑनलाईन झाले पाहिजे. यासाठी साखर आयुक्त कार्यालयावर मोठा मोर्चा निघाला. त्यामुळे साखर आयुक्तांनी राज्यातील सर्व साखर कारखान्याचे काटे ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला. परंतु एक रक्कमी एफ आर पी (sugarcane FRP) आणि इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांची एकजूट दाखवणे गरजेचे असल्याने १७ आणि १८ नोव्हेंबरला संपूर्ण राज्यामध्ये स्वाभिमानीच्या नेतृत्वामध्ये ऊसतोड बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. आज नाशिक जिल्ह्यात या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वात ऊस बंद आंदोलन करण्यात आले होते.

ऊसाला एक रक्कमक एफआरपी, साखरेला ३५ रुपये किलो दर देण्यात यावा, इथेनॉल (Ethanol) दरात लीटरमागे पाच रुपये वाढ करावी आणि इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मागण्या मान्य झाल्या नाही तर आगामी काळात आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी आंदोलकांकडून देण्यात आला आहे. साखर (sugar) ही अन्नधान्यासारखी जीवनश्याक वस्तू नाही म्हणून तिची निर्यात खुली करणे गरजेची आहे. काटेही ऑनलाईन करावे अशी मागणी यावेळी नाशिकमध्येही करण्यात आली.