नव्या वर्षात नाशिककरांसाठी गोड बातमी..!

नाशिक : नव्या वर्षात नाशिककरांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. चालू बंद विमानसेवेमुळे नाशिककरांना जो त्रास होत होता, त्या पासून लवकरच नागरिकांना सुटका मिळणार आहे. कारण मार्चपासून स्पाइस जेट आणि इंडिगोची विमानसेवा सुरू होणार आहे. नव्या वर्षात नाशिकची देशातल्या ७ मोठ्या शहरांशी एअर कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. त्यामुळे नाशिककरांचे नवे वर्ष गोड होईल.

नाशिक विमानतळावरून देशातल्या ५ महत्त्वाच्या शहरांसाठी विमानसेवा सुरु होणार आहे. आता देशातल्या ७ मोठ्या शहरांशी नाशिकची एअर कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. दिल्ली आणि हैदराबाद पाठोपाठ बेळगाव, बेंगलोर, गोवा, नागपूर, अहमदाबाद शहरांसाठी विमानसेवा सुरु केली जाईल. त्यामुळे शहराची कनेक्टिव्हिटी वाढणार या दृष्टीनेही ही बातमी आनंदाची आहे.

गेल्या काही महिन्यांपासुम नाशिकची विमानसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे नाशिक विमानतळ पुन्हा महिनाभर बंद करण्यात आले होते. त्यामुळे नाशिकहून फक्त एकच विमानसेवा सुरु होती. मात्र नव्या वर्षात नाशिककरांना जणू गिफ्ट मिळाले आहे. कारण नव्या वर्षात दोन कंपन्यांही नाशिक विमानतळाला पुन्हा एकदा सेवा सुरु करणार आहे.

नाशिकहून दिली आणि हैदराबाद पाठोपाठ मार्च २०२३ पासून स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन विमान कंपन्या नागपूर, बेळगाव, अहमदाबाद, गोवा, बेंगलोर विमानसेवा सुरू करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे नाशिक विमानतळाला देशातील दिल्ली, हैदराबाद त्यानंतर आता बेळगाव, बेंगलोर, गोवा, नागपूर, अहमदाबाद ही प्रमुख शहरे देखील जोडली जातील.

जवळपास महिनाभरापूर्वी नाशिकचे विमानतळ खुले करण्यात आले. दुरुस्तीच्या कामामुळे विमानसेवा बंद करण्यात आली होती. त्या आधीच काही विमानसेवा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे विमानसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. विमानसेवांना आकर्षित करण्यासाठी त्यावर उपाय म्हणून ओझर विमानतळावर नवी धावपट्टी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने नाशिक विमानतळावर सध्याच्या धावपट्टीच्या समांतर एक नवीन धावपट्टीची योजना आखली होती. ज्यामुळे ऑपरेशनल क्षमता वाढून भविष्यात शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन विमान वाहतुकीची गरज पूर्ण होईल, हा उद्देश होता.