जळगावातील वातावरण प्रचंड तापले असून दोन दिग्गज नेत्यांनी एकमेंविरोधात रणशिंग फुंकले आहे. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन ( BJP leader and minister Girish Mahajan) आणि राष्ट्रवादी नेते आणि आमदार एकनाथ खडसे हे सध्या एकमेकांविरोधात लागले असून अनेक दिवसांपासून दडपून ठेवलेले एकमेकांचे प्रकरणे हे दोन्ही नेते बाहेर काढत आहेत. यावरून जळगावसह राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून चर्चाना उधान आले आहे.
खडसेंचा हल्लाबोल
एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजानाबद्दल उद्गार काढले होते की, गिरीश महाजन यांना मुलगा असता तर तो राजकारणात आला असता आणि सूनही राजकारणात आली असती” असे खडसे यांनी म्हंटले होते.
महाजनांचे जोरदार प्रतिउत्तर
महाजन खडसे यांच्यावर बोलताना म्हणाले, दूध संघात (Jalgaon Milk Union) सुरू असलेल्या चौकशीत दररोज काहीतरी बाहेर येत आहे. त्यामुळे एकनाथ खडसे अस्वस्थ झाले आहेत. ते काहीही बोलायला लागले आहेत. ते मला चावट म्हणतात. परवा बोलताना ते म्हणाले, महाजन यांना मुलगा असता तर तोही आमदार आणि सूनही आमदार झाली असती. त्यांचे हे बोलणे चुकीचे आहे.
“मला दोन मुली आहेत. त्याचा मला अभिमान आहे. मात्र खडसे यांना एक मुलगा होता, त्याचे काय झाले? त्याने आत्महत्या केली की त्याचा खून झाला, हेसुद्धा तपास करण्याची आता गरज आहे. वास्तविक, मला हे बोलायचे नव्हते; परंतु मला आता ते बोलणे भाग पडले आहे.”
खडसे म्हणाले,
महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या मुलाचा मृत्यूवर प्रश्न उपस्थित करत आत्महत्या की खून झाला याचा शोध घ्यावा लागेल असे म्हणत मला बोलायला लावू नका असे म्हंटलं होतं. यावर एकनाथ खडसे म्हणाले, महाजनांच्या वक्तव्यामुळे खडसे कुटुंबाला वेदना झाल्या, गिरीश महाजन यांनी केलेले विधानाने माझ्या कुटुंबाला खूप वेदना होत असून मला साठ-सत्तर फोन आले असेही एकनाथ खडसे यांनी म्हंटले. खडसेंनी गिरीश महाजनांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे.
पुढे बोलताना खडसे म्हणाले, फर्दापूरच्या गेस्टहाऊसवर काय भानगड झाली होती, त्यावेळी मी देखील त्या गेस्टहाऊसवर होतो. मी अनेक कृत्ये उघड्या डोळ्यांनी पाहिली आहेत. तेव्हा पेपरमध्ये चवीने छापून यायचे. मी त्यावर काही बोललो नाही. गिरीश भाऊ यांचे अनेक प्रेम संबंध आहेत. याचा कधी उल्लेख मी केला नाही. एखाद्याचे प्रेमसंबंध असू शकतात, असे एकनाथ खडसे यांनी म्हंटले आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चाना उधान आले आहे. दोन्ही नेते एकमेकांवर गंभीर टीका करत असून याचे पडसाद राजकीय वर्तुळात दिसत आहेत.