नाशकात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले असून किरकोळ वादतून टोळक्यांनी कपडे दुकानदाराला दांडक्यांनी मारहाण केली आहे. शहरातील आनंदवली परिसरातील ही घटना असून या दहशत माजवणाऱ्या गुंडांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. किरकोळ कारणावरून कपडा विक्रेत्यावर लाकडी दांडके आणि काठ्यांनी हल्ला केला आहे. हल्ल्याचा प्रकार cctv मध्ये कैद झाला असून हल्ल्यात विक्रेता गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
नाशिक शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचे प्रकार वाढत आहेत. शहरात टोळकेच्या टोळके आपली दहशत पसरवण्याच्या नेहेमी प्रयत्नात असतात. काहीही किरकोळ वादतून लगेच हाणामारीवर उतरतात कायदा व सुव्यवस्थेला धाब्यावर बसवून आपली दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असतात. नाशकात अश्या अनेक प्रकारच्या घटना घडल्या असून त्यात वाढच होत आहे. अशीच एक घटना आता घडली आहे.
पहा cctv व्हिडिओ
नाशिकच्या गंगापूर रोडवरील आनंदवल्ली परिसरातील काल रात्रीची ही घटना असून दिवाळीसाठी कपडे खरेदीला आलेल्या टोळक्यांनी किरकोळ कारणावरून कपडा विक्रेत्यावर लाकडी दांडके आणि काठ्यांनी हल्ला केला आहे. विक्रेता गंभीर जखमी असून नाशिक जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांचा धाक नाही राहिला
नाशकात गुन्हेगारी वाढतच चालली असून किरकोळ कारणांवरून शहरात प्राणघातक हल्ले तर कुठे खून होत आहेत. शहरातील या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांवर पोलिसांचा धाक नसल्याचे स्पष्ट होते. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून हे गुन्हेगारी पसरवणारे अधिकच दहशत पसरवण्याचे काम करत आहेत. नाशिक शहर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत यावर कडक उपयोजना करत अश्या गुंड प्रवृत्तींना वेळीच ठेचायला हवे अन्यथा नाशकात अधिक दहशत पसरतच राहील.