Thane Crime News: नऊ वर्षांची मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता, पाण्याच्या टाकीत सापडला कुजलेला मृतदेह

Thane Crime News : महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नऊ वर्षांची मुलगी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती. तिचा कुजलेला मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला.

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून एक नऊ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवसांनी तिचा कुजलेला मृतदेह घराजवळील एका इमारतीच्या पाण्याच्या टाकीतून सापडला.

पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भिवंडी तहसीलमधील ही मुलगी ३ एप्रिल रोजी बेपत्ता झाली होती आणि बुधवारी तिचा मृतदेह सापडला. भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.

मुलगी बाजारात गेली होती

मुलगी अमजदिया शाळेजवळील किराणा दुकानातून अंडी घेण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र, ती घरी परतली नाही. तिच्या घरच्यांनी खूप शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. त्यानंतर तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.तपासात पोलिसांना माहिती मिळाली की, परिसरातील एका इमारतीच्या पाण्याच्या टाकीत मुलीचा मृतदेह सापडला आहे.

उग्र वासाची शंका

रहिवाशांनी पोलिसांना सांगितले की, पाण्याचा वास आल्यानंतर त्यांनी पाण्याच्या टाकीची तपासणी केली असता त्यांना हा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असल्याचे त्यांनी सांगितले. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.