ध्वजारोहण सोहळ्यात ठेकेदाराने केला आत्मदहनाचा प्रयत्न

मालेगाव : शहरात स्वतंत्र दिनाच्या दिवशी ध्वजारोहण सोहळ्यात एका ठेकेदाराने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. देशात स्वातंत्र्याचा अमृत मोहत्साव साजरा केला जात असताना मालेगावी ध्वजारोहण सोहळ्यातच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोरोना संसर्गकाळात लॉकडाऊन असतांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा, वाहने तसेच पोलिसांना भोजन पुरविणाऱ्या ठेकेदारास दोन वर्षाचा कालावधी उलटूनही थकीत बिलन मिळाल्याने संबधित ठेकेदाराने हे पाऊल उचले आहे.


ठेकादाराला ९३ लाख ९५ हजार ५४७ रुपयांचे थकीत बिल वारंवार मागणी करूनही न मिळाल्यायाने संतप्त झालेल्या ठेकेदाराने काल ध्वजारोहण प्रसंगी अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. काल सकाळी ठेकेदार राजू मोरे  यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आता, आत्मदहनाचा प्रयत्न केला हा प्रकार वेळीच जवळ उभ्या असलेल्या नागरिकांच्या लक्ष्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.


कोविड काळात बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांच्या भोजनासह शहरात अंतर्गत वहातुक, वाहने, मंडप, लाईट ,ध्वनीक्षेपक, पाणी, सीसीटीव्ही अशा विविध सुविधा पुरविण्याचा ठेका राजू मोरे व अन्य पुरवठादार यांना देण्यात आला होता. या सुविधांसाठी मोरे यांनी 93 लाख 95 हजार 547 रुपयांचे बिल जमा केले होते. वाहनधारकांचे सुमारे १३ लाखांचे बील थकीत आहे. दोन वर्ष उलटूनही पोलिसांकडून बील मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेत हे पाऊल उचलल्याचे मोरे यांनी सांगितले.