आजपासून रात्री बारा वाजेपर्यंत देखावे – आरस पाहता येणार

नशिक:- गणेशोत्सव काळात गणेश मंडळांकडून विविध प्रकारचे देखावे साकारण्यात आले आहे. (ganesh festival)गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत देखाव्याच्या माध्यमातून संदेश दिले जातात. जसे की रस्ते आपघात कसे होतात. ते टाळण्यासाठी काय करावे काय करू नये आशा विविध प्रकारची माहिती या देखाव्याच्या माध्यमातून दिली जाते हे देखावे बघण्यासाठी गणेशभक्त कुटुंबियासोबत मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.

दिवस भर काम करून रात्री देखावे (decoration) मंडळांनी साकारलेले आरस बघण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते. परंतु राज्यसरकार ने ठरवून दिलेल्या वेळेत बऱ्याच भाविकांना देखावे बघण शक्य होत नाही. राज्य शासन व न्यायालयाच्या आदेशानुसार शेवटचे चार (last four day festival)दिवस गणेश मंडळांना रात्री बारा वाजेपर्यंत आरास देखावे व ध्वनीक्षेप मर्यादित आवाजात सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

त्यामुळे भाविकांनाही कुटुंबा सोबत देखावे बघता येतील गणेशोत्सव असो की नवरात्र उत्सव असो सार्वजनिक मंडळांना त्यांच्या आरस देखावे खुले ठेवण्यास व त्यावरील ध्वनीवर वाद्य वाजविणे धार्मिक गीत गायनाच्या कार्यक्रमास रात्री वाजेपर्यंतच मुदत दिलेली असते. मात्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांकडून होणाऱ्या मागणीची दखल घेत शासन स्तरावर वरून पालकमंत्री दादा भुसे यांनी गेल्या आठवड्यात यंदा गणेश मंडळांना शेवटचे चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत मर्यादित आवाजात वाजवण्यास परवानगी देण्यात येणार असल्याची जाहीर केले होते.

त्यामुळे आता शेवटचे चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत आरस आणि देखावे बघायला परवानगी मिळाल्याने गणेश मंडळ आणि भविकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. दरम्यान गणेश उत्सवाचे शेवटचे चार दिवस देखावे बघण्याकरिता भाविकांची गरज होणारी गर्दी लक्षात घेता शहरातील काही मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांकरिता सायंकाळी सहा ते रात्री बारा या वेळेत प्रवेश बंद राहणार आहे. प्रमुख मार्गांवरील वाहनांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आव्हान वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.