नाशिक शहरात आपघातांची मालिका सुरूच

नाशिक:- नाशिक शहरात आपघाताचे सत्र सुरूच आहे शनिवारी पाहटेच्या सुमारास  नाशिक – मुंबई महामार्गावर लतिफवाडी जवळ एक विचित्र भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या  आयशरला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा आपघात झाला. धडक देऊन ट्रक  पलटी झाला पलटी झालेल्या ट्रकला ही अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक देऊन वाहनचालक घटना स्थळावरून फरार झाला  या विचित्र अपघातात ट्रक ड्रायव्हर जागीच  ठार झाला. हा आपघात झाल्यानंतर उशिराने आपत्ती व्यवस्थापन टीम, रुट पेट्रोलिंग टीम, महामार्ग पोलिस यांना मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या तिहेरी  भीषण आपघातामुळे  काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक मुंबई महामार्गावर उभ्या आसलेल्या आयशर ला ट्रक ने जोरची धडक दिल्याने हा भीषण आपघात झाला. ट्रक चालक फरार झाला यात ट्रक आणि आयशरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  यामुळे महामार्गावरील वाहतुकीस खोळंबा झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.राज्यातील सर्वाधिक आपघातांच्या तुलनेत नाशिक अव्वल ठरत आहे. राज्यात समृद्धी महामार्गावर सातत्याने आपघातांची मालिका सुरू आहे. त्यातच नाशिकमध्येही आपघात सुरूच आहे.गेल्या वर्षभरामध्ये समृद्धी महामार्गावर ६०० हूंन आधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला.

त्यामुळे समृद्धी महामार्ग हा मृत्यूचा महामार्ग बणतोय की काय म्हणायची वेळ आली आहे. नाशिक मध्ये मागील काही महिन्यांपासून केंद्रासारकरच्या “स्मार्ट सिटी” योजने अंतर्गत रस्ते रुंदीकरनाचे काम सुरू आहे त्यामुळे देखील रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू, खडी आसल्यामुळे वाहतूक कोंडी होते आणि वाहतूक कोंडी झाल्यास नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यामद्धे काही ठिकाणी पाईपलाइन चे काम सुरू आसल्याने नाशिक शहरात आपघाताचे प्रमाण वाढत आहे.