नाशकात व्हायरल तापाचा धोका बळावतोय; चिंताजनक आकडेवारी समोर

यंदा व्हायरल तापाने डोके वर काढले असून, ऑगस्ट महिन्याचा रुग्णांचा आकडा देखील चिंताजनक आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यात शहरांमध्ये ४४२४ व्हायरल तापाचे रुग्ण आढळून आल्याची बाब वैद्यकीय विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. अद्यापही अशा तापांचे रुग्ण आढळत असून अशा रुग्णांनी गर्दीत जाऊ नये असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

कोरोनानंतर बळावतोय स्वाईन फ्लू, चिकूनगुनिया, डेंगी व तापाचा आजार

शहरात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली असतानाच आता विविध घातक रोगांनी डोके वर काढले आहे. आता स्वाईन फ्लू, चिकूनगुनिया, डेंगी व तापाच्या आजारांचे भीती निर्माण झाली आहे. या रुग्णांचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे आता पर्यंत शहरात अनेक जान आजारी पडले आहे. आणि याचा आकडा वाढतच चालला असून, त्यामुळे शहरातील परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे.

सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात रुग्णसंख्या मोठ्याप्रमाणावर वाढली

ऑगस्ट महिन्याचे प्राप्त झालेल्या अहवालानुसार ४४२४ वायरल तापाचे रुग्ण आढळून आले आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २०९ व्हायरल तापाचे रुग्ण आढळून आले. महापालिकेच्या रुग्णालयांची ही आकडेवारी असली तरी खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात व्हायरल तापाच्या आजारावर उपचार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे 

महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी व्हायरल तापाचे विश्लेषण करताना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. घसा खवखवणे, ताप खोकला, अंगदुखी अशा प्रकारची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांनी घराच्या बाहेर व विशेष करून गर्दीत जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.