चोरट्यांची मजल! थेट स्थानकातून एसटीच बसच लांबवली..

बुलडाणा : महागड्या वाहनाच्या चोऱ्या, अलिशान कार आणि दुचाक्यांच्या चोऱ्या असल्या बातम्या आपण नेहेमीच वृत्तपत्रांमध्ये वाचतो मात्र थेट स्थानकातून एसटीच लांबणारी ही चक्क करणारी बातमी आहे. हो ही घडना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बस स्थानकात घडली आहे. मध्यरात्री चोरांनी MH 07 C 9273 या क्रमांकाची बस लांबवली. घटनेने अनेक जण चक्रावले असून बस प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

तर अशी घडली घटना

परवा रात्री MH 07 C 9273 या क्रमांकाची मानव विकास मिशनची बस चालक वाहक ड्यूटी संपवून स्थानकात पार्क केली. त्यानंतर ते आपआपल्या दिशेने रवाना झाले. विश्रांती कक्षात विश्रांतीसाठी दोघेही निघून गेले. त्यानंतर बस तिच्या जागेवरूनच गायब झाल्याने चालक व वाहक बुचकळ्यातच पडले त्यानंतर तक्रार एसटी बसच्या चालकाने देऊळगाव राजा पोलिसात दिली. 

देऊळगाव राजा बस स्थानकात उभी असलेली बस परवा मध्यरात्री अज्ञातांनी चोरली. मात्र ही बस देऊळगाव राजा ते चिखली मार्गावर आढळून आली. या बसचा ब्रेकवर सेंट्रल जॉईंट तुटला आणि त्यामुळे बस नादुरुस्त झाली. त्यामुळे बस चोरुन नेणाऱ्याला अखेर बस तिथेच सोडून पळ काढावा लागला. मात्र या एसटी बस चोरीची संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

दरम्यान, अश्या प्रकारच्या घटना तुरळकच घडल्या असून थेट महामंडळातील बसवरच चोरट्यांनी डाव साधायचा प्रयत्न केला मात्र एसटी आणि महामंडळाच नशीब त्यांच्या एसटी बस या कामावर आलेल्या असतात आणि नादुरुस्त झालेल्या एसटीमुळे त्यांना ती तिथेच ठेवून पोबारा केला. हे प्रकरण सध्या गांभीर्याने घेण्यात आलं असून याची चौकशीही केली जात आहे.