Home » गंगापूर रोडवरील वाईन शॉपवर चोरट्यांचा डल्ला!

गंगापूर रोडवरील वाईन शॉपवर चोरट्यांचा डल्ला!

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील समाधान वाईन मार्ट या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी तब्बल ९८ हजार ५०० रुपयांची महागडी दारू लंपास केली आहे. ही पूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर घटना अशी की गंगापूर रोडवरील स्टर्लीन अपार्टमेंटमध्ये समाधान वाईन मार्ट आहे. चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात दुकानाच्या ग्रिल दरवाजाच्या लोखंडी पट्टया तोडून शटरचे कोंडे तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील जुन्या आणि महागड्या दारूच्या बाटल्यासहित पोबारा केला आहे. यामध्ये दुकानातून जॉनी वॉकर (१८ वर्ष जुनी) ३ बाटल्या, गोल्ड लेबल ३ बाटल्या, जॉनी वॉकर लो लॕन्ड ४ बाटल्या, जॉनी वॉकर स्पेस साईट ४ बाटल्या, जॉनी वॉकर सिंगल टर्न (१८ वर्षे जुनी) २ बाटल्या,जॉनी वॉकर लो लॕन्ड (१५ वर्षे जुनी) २ बाटल्या, आर्टबर्ग ३ बाटल्या, कावा लॕन्ड २ बाटल्या, ग्लेन मोरंजी लासंटा १ बाटली, ग्लेन ग्रान्ट (दहा वर्षे जुनी) १ बाटली तसेच १३ हजार ५०० रुपये असा एकूण ९८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

याबाबत समाधान वाईन्सचे व्यवस्थापक रविंद्र विठ्ठल साळी यांनी फिर्याद दिली आहे. साळी हे सोमवारी रात्री दुकान बंद करून गेल्यानंतर चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यांनतर दुकानांतील विविध दारूच्या बाटल्या लंपास केल्या आहेत. तब्बल ९८ हजारांचा माल चोरीला गेल्याचे माळी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

हा सर्व प्रकार दुकानात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. तोंडाला मास्क लावलेल्या चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केल्याचे त्यात दिसून येत होते. समाधान वाईन्सचे व्यवस्थापक रविंद्र विठ्ठल साळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!