आसनगाव स्थानकावर बर्निंग लोकलचा थरार..!

मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानकाजवळ लोकल ट्रेनच्या खालच्या बाजूतून अचानक धूर निघायला लागल्याची घटना समोर आली असून प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. अशात प्रवाशांनी जीव धोक्यात लोकल मधून उड्या मारल्याचे दृश्य समोर आले आहे. अचानक रेल्वेच्या खालच्या बाजून धूर निघायला सुरुवात झाल्याने गोंधळ उडाला आणि त्यानंतर प्रवाशांनी उड्या मारायला सुरुवात केली.

आसनगाव स्थानकात जवळ लोकल ट्रेनच्या खालच्या बाजूतून धूर, जीव धोक्यात घालून प्रवाशांनी मारल्या लोकल मधून उड्या..पहा व्हिडीओ

मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानका जवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कसारा लोकलच्या चाकातून अचानक धूर निघायला सुरुवात झाली. त्यामुळे लोकलला आग लागल्याची बीती प्रवाशांना वाटली. धूर पाहून आग लागल्याच्या भीतीने तात्काळ प्रवाशांनी ट्रेन मधून उड्या मारल्या. याबाबतची माहिती काही प्रवाशांनी तात्काळ आसनगाव स्टेशन मास्तर यांना दिली. परंतु चाकरमानी प्रवाशी यांनी रेल्वे ट्रॅक मधून चालत आसनगाव स्थानक गाठले. सुदैवाने कोणती ही जीवित हानी झाली नाही.

सुरुवातीला धूर निघायला लागल्यावर कधीही आग लागेल अशी शक्यता प्रवाशांना वाटली. त्यामुळे प्रवाशांनी तात्काळ लोकल मधून बाहेर पडण्यास सुरुवात झाली. यामुळे रेल्वे लाईन वरच पाई प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. जीव धोक्यात घालून प्रवासी या ठिकाणी चालत होते. परंतु दुसरीकडे या लोकल मधून का धूर निघत होता याचे कारण अद्यापही समोर आले आहे. दरम्यान त्याचा तपास रेल्वे यंत्रणेकडून सुरु आहे.

मध्य रेल्वेवरील ग्रीन स्थानक म्हणून आसनगाव स्थानकाची ओळख आहे. या स्थानकावरून आसनगाव, कसारा या दिशेकडील लोकला ये-जा करत असतात. दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कसारा लोकलमध्ये हा प्रकार घडला आहे. चाकातून धूर निघाल्यानंतर चाकाला आग देखील लागलेली दिसून आले. त्यामुळे नागरिक अधिकच भयभीत झाले होते.

कल्याण- कसारा ही लोकलला सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली . प्रवाशांनी केलेला ओरडा, गार्डच्या लक्षात येताच तात्काळ लोकल आसनगाव स्थानका जवळील पादचारी पुलाजवळ थांबविण्यात आली. लोकलच्या डब्या खालील चाकांमधून धूर आणि तेवढ्याच भागात आग लागली होती. आगीचे स्वरुप लहान असल्याने दोन ते तीन प्रवाशांनी धाडस करुन जवळील पाण्याच्या बाटल्यांमधील पाणी आगीवर फेकले. त्या पाण्याच्या माऱ्याने आग विझली होती. मात्र आगीमुळे लोकल आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ २० मिनिट खोळंबली होती.