दोन विवाहित जोड्यांचे एकमेकांत प्रेमसंबंध! एक मृत, एक जोडी खाणार जेल ची हवा..

एका तरुणाचे विवाहबाह्य संबंध होते त्यातून त्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाची हत्या त्याची पत्नी आणि ज्या महिलेशी संबंध होते तिच्या पतीने मिळून केली आहे. गळा दाबून आणि डोक्यात धारधार शस्त्राने वार करुन ही निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील बांधनपाडा इथे ही घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. त्यात आणखी धक्कादायक म्हणजे आरोपी पत्नी खुनातील साथीदार यांचे देखील अनैतिक सबंध असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेक जण चक्रावून गेले आहेत. संतोष रामा टोकरे (वय. ३५) असे मृत पतीचे नाव आहे. याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष टोकरेचे एका विवाहित महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. ही महिला त्याच्या नात्यातलीच होती. या महिलेचे देखील लग्न झाले होते. तरीही संतोष आणि या महिलेचे अनैतिक संबंध होते. मात्र याबद्दल संतोषची पत्नी आणि या महिलेच्या पतीला कळले. यातूनच दोघांनी संतोषचा काटा काढण्याचे ठरवले. त्यातूनच संतोष टोकरे रात्री झोपेत असतानाच त्याची गळा दाबून आणि डोक्यात धारधार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व आरोपींचा बनाव उधळून लावला. वाडा पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यात धक्कादायक म्हणजे संतोष टोकरेच्या पत्नीचेही आरोपीसोबत प्रेमसंबंध असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.