उमेश कोल्हे प्रकरण! तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फोन कॉलची चौकशी..

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून उमेश कोल्हे प्रकरण चोरीच्या दिशेने वळवण्यात आले असा गंभीर आरोप रवी राणा यांनी विधिमंडळात केला यावरून आता या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे.

आमदार रवी राणा यांनी उमेश कोल्हे प्रकरणाची चौकशी संशयाच्या फेऱ्यात ओढली आहे. त्यांनी तत्कालीन अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच हे प्रकरण चोरीच्या दिशेने वळवण्यास सांगितले गेले उद्धव ठाकरे यांनी आरती सिंग यांना फोन करून हे सांगितल्याचे रवी राणा यांनी विधिमंडळात सांगितले.

यावरून आता या सर्वांची राज्य गुप्तचर यंत्रणा चौकशी करणार आहे. यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोनची चौकशी होणार असल्याचीही माहिती शंभूराज देसाई यांनी विधिमंडळातली आहे.

रवी राणा यांचे गंभीर आरोप

उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरुन हे प्रकरण चोरीच्या दिशेने वळवण्यास सांगितले गेले. उद्धव ठाकरे यांनी आरती सिंग यांना फोन केल्याचा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. ते म्हणाले, उमेश कोल्हे यांची हत्या झाली कारण ते हिंदू विचारांच्या पोस्ट व्हायरल करत होते. त्यांना धमक्या देखील येत होत्या. याबाबत आम्ही पोलीस आयुक्त आरती सिंह यांना कल्पना दिली होती. त्यांची हत्या झाली पण उद्धव ठाकरे यांचा दबाव असल्याने ती केस चोरीमध्ये फिरवण्यात आली.

यावर उत्तर देताना मंत्री शंभूराजे देसाई यांनी माहिती दिली की, या आरोपांबाबत चौकशी होऊन अहवाल राज्य गुप्तचर यंत्रणा देणार आहे. गुप्तचर आयुक्तांनी या सगळ्या गोष्टी कळवल्या जातील येत्या पंधरा दिवसांच्या आत सविस्तर अहवाल मागवला जाईल यामध्ये कुणाचा फोन आला का हे तपासले जाईल, असे शंभूराज देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.