दुर्दैवी ! लेकीला वाचविण्यासाठी बापाने स्वतःचा जीव धोक्यात टाकला अन..

स्वतःच्या प्राणाची चिंता न करता लेकीला वाचविण्यासाठी वडिलांनी जीव गमावल्याची एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना कोल्हापूर मधील असून मन हेलवणारी आहे. बाप जीवनभर आपल्या मुलांना सर्व काही देत असतात आणि गरज पडली तर अगदी प्राण देखील देतात याचा प्रत्यय या घटनेतून आपल्याला होईल.

कोल्हापूर शहराच्या जवळ असेल्या एका तालुक्यातील ही घटना आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी सर्व कुटुंब घरातील धुणं धुण्यासाठी गावातील एका खणीवर गेले. या ठिकाणी मदत करत असताना मुलीला पाण्याचा अंदाज आला नाही आणि ती पाण्यात बुडायला लागली. वडिलांच्या मुलगी खणीत पडली. मात्र तिला पोहता येत नव्हते त्यामुळे तिचा जीव वाचविण्यासाठी स्वतःला पोहता येत नसताना वडिलांनी पाण्यात जात मुलीला बुडताना वाचवले. मात्र दुर्दैव म्हणजे तिला वाचवत असताना त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात बुडाले.

सतीश दत्तात्रय गोंधळी असे वडिलांचे नाव असून बुडाल्यानंतर त्यांच्या पतीने आर्दओरदा सुरु केला. त्या मदतीसाठी अर्दओरदा करत असताना तेथून जात असणार्या एका जणाने त्यंना बाहेर काढले. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, भाऊ, भावजय असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे गोंधळी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

वडिलांनी मुलीला बाहेर काढल्याने ती बचावली. मात्र, त्यांचा तोल गेल्याने मृत्यूने त्यांना कवटाळले. ते पाण्यात बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी लवकर मदतीला कोणी नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून अंत झाला. मुलीला वाचविण्यासाठी वडिलांनी स्वतः च्या जीवाची परवा केली नाही.