दुर्दैवी..! दीड वर्षाच्या चिमुकलीचा करुण अंत..

देवळा तालुक्यातील डोंगरगाव या गावात दीड वर्षाच्या बालिकेचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस लहान मुलांच्या अशा दुर्घटनेत वाढ होताना दिसत असून पुन्हा एक बातमी समोर आली आहे.बालिकेचा घरासमोरच्या पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वीरा सावंत ही दीड वर्षाची चिमुकली शेतातील घरासमोरअंगणात खेळत होती. खेळता खेळता ती गुरांना पाणी पिण्यासाठी बांधलेल्या सिमेंटच्या पाण्याच्या टाकीकडे गेली आणि टाकीत पडली. चिमुकलेने जीव वाचवण्यासाठी प्रचंड आटापिटा केला. मात्र तो असफल ठरला. आजूबाजूला कोणीही नसल्याने काही वेळात तिचे हातपाय शांत झाले आणि तिचा करूण अंत झाला.

सकाळची वेळ असल्याने घरातील सर्व जण आपापल्या कामात मग्न होते. कोणी घर कामात तर कोणी शेती कामात व्यस्त असल्यामुळे कोणाचेच तिच्याकडे लक्ष गेले नाही. त्यामुळे ती खेळता खेळता कधी टाकीकडे गेली आणि कधी टाकीत पडली याचा कुणालाही अंदाज आला नाही. टाकीकडे जाऊन टाकीत तोल गेल्याने ती पाण्यात बुडाली. त्यात जीव गुदमरून तिचा अंत झाला. घरात ती एकुलती एक मुलगी होती. तिच्या मृत्यूने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. तर या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिवसेंदिवस लहान मुलांची काटेकोरपणे काळजी घेणे किती महत्वाची आहे, याची जाणीव करून देणाऱ्या घटना वाढत चालल्या आहे. खेळता खेळता लहान मुलं धोकादायक ठिकाणी जाऊ शकतात, विजेच्या उपकरणांशी त्यांचा संपर्क येऊ शकतो किंवा विषारी पदार्थ त्यांच्या हातात लागला तर होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागत नाही. ही अशीच एक घटना समोर आली आहे.

ही अत्यंत दुर्दैवी घटना असून लहान मुलांवर लक्ष देणं किती गरजेचं आहे हे या घटनेतून स्पष्ट होत आहे. आपले पाल्य घरात असो किंवा घराबाहेर असो ते धोकादायक वस्तूंच्या संपर्कात येऊ नये त्यातल्या त्यात घराजवळ पाण्याचे स्त्रोत टाकी किंवा स्विमिंग पूल असे काही असल्यास अधिकच काळजी घ्यावी. या घ्त्नानातून पालकांनी महत्वाचा संदेश घेणे महत्वाचे आहे. तसेच विषारी औषध, विजेच्या उपकरणांशी किंवा इतर धोकादायक वस्तू त्यांचा संपर्क येऊ नये ही पुरेपूर जबाबदारी पालकांची असते. लहान मुलं अत्यंत अस्थिर असतात. त्यामुळे त्यांच्या लहान-मोठ्या हालचालींवर आणि ते ज्या ठिकाणी जातात त्या जागेवर लक्ष देणे महत्त्वाचं आहे. लहान मुलांना बाहेर घेऊन जात असताना किंवा घरात असताना देखील त्यांची योग्य देखरेखहोणे अत्यंत गत्जेचे आहे.