जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ अनोखं आंदोलन

By – Revati walzade

नाशिक : माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये मुक आंदोलन करण्यात आलं आहे. ‘हरहर महादेव’ चित्रपटामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले. त्यात राष्ट्रवादीने चित्रपटाविरोधी भूमिका घेतली. चित्रपटगृहात मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी आव्हाडांवर गुन्हा दाखल झाला. आधी मारहाण आणि मग विनयभंगाच्या आरोपामुळे जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीमध्ये वाढ झाली. अशात त्यांच्यावर दाखल गुन्ह्याप्रकरणी राज्यभरात राष्ट्रवादी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. गेल्या आठवड्याभरात जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले ते गुन्हे खोटे आहेत असा आरोप करत आव्हाड समर्थकांनी नाशिकच्या हुतात्मा स्मारकात गांधीगिरी मार्गांने मूक आंदोलन करत आव्हाडांवर दाखल झालेल्या गुन्ह्या विरोधात निषेध केला आहे.

मागील आठवड्यात जितेंद्र आव्हाड यांच्यावर २ गुन्हे दाखल करण्यात आले आहे पण हे गुन्हे खोटे आहेत असा आरोप करत युवक राष्र्टवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग व शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वात नाशिक मधील हुतात्मा स्मारकात गांधी विचारांचे म्हणजेच मूक आंदोलन केले आहे हे आंदोलन जवळपास दिवसभर चालू होते. आव्हाड यांच्यावर सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप युवक राष्र्टावदिच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. माजी मंत्री आव्हाड यांनी संबंधित महिलेला फक्त गाडी समोरून बाजूला केलेले आहे. यात त्या महिलेचं कोणत्याही प्रकारचा विनयभंग होत नाही असे त्या व्हिडीओ मध्ये स्पष्ट दिसतआहे असे म्हणत आंदोलन करण्यात आले . जितेंद्र आव्हाड देखील या विषयी बोलताना म्हणाले होते कि एकवेळ खुनाचा आरोप चालेल पण विनयभंगाचा आरोप नको

या सर्वात मागील आठवड्यात एका मंत्र्याने सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या भाषेत वक्तव्य केली होती पण त्या वेळी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही किंवा साधी एफ आय आर सुद्धा दाखल करण्यात आली नाही, असा प्रश्नच यावेळी युवक समर्थकांनी उपस्थित केलाय. परंतु आव्हाडांवर ३दिवसांतच २ गुन्हे दाखल केले आहे आणि हा अन्याय असल्याचा आरोप केला आहे.यावेळी प्रदेशाध्यक्ष सचिव शादाब सैयद , राष्ट्रवादी युवक पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळा निगळ राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष गणेश गायधनी जिल्हा उपाध्यक्ष दिनेश धात्रक , जिल्हा युवक सरचिटणीस गोरख ढोकणे नाशिकरोड अध्यक्ष निखिल भागवत किरण कातोरे निलेश सानप , नाराज रामराजे सागर नागरे दुर्गेश कबाडे वैभव झाडे , निलेश भांडुरे , निलेश सानप आदी पदाधिकारी होते.