नाशिक शहरात उद्या ‘या’ भागात राहणार पाणी पुरवठा बंद!

नाशिककरांसाठी महत्वाची सूचना आहे. शहरातील मनपाचे पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील आरपी हनुमानवाडी जलकुंभ भरण्यासाठी जुनी पंपींग मशिनरी बदलून नवीन पंपींग मशिनरी बसविण्याचे काम करणार असल्याने पंचवटी विभागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे याचे आवाहन करण्यात येत आहे.

काय होणार आहे काम

नाशिक मनपाचे पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील आरपी विदयालय, हनुमानवाडी जलकुंभ भरणेसाठी जुनी पंपींग मशिनरी बदलून नवीन पंपींग मशिनरी बसविणेचे काम करावयाचे असल्याने पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील सदर जलकुंभाचे पंपींग बंद ठेवावे लागणार आहे. त्यामुळे पंचवटी परिसरातील शनिवार दि. 17/09/2022 रोजीचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच दि. 18/09/2022 रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने कमी प्रमाणात होईल याची नाशिककरांनी नोंद घ्यावी.

पंचवटी परिसरातील कोणत्या भागात पाणी येणार नाही

पंचवटी परिसरातील प्रोफेसर कॉलनी, मोरे मळा, हनुमानवाडी क्रांतीनगर, कृष्णनगर, शिंदे नगर, जाणता राजा कॉलनी, जगझाप मार्ग, जाधव कॉलनी, मधुबन कॉलनी, नाग चौक, गजानन कॉलनी, सितागुंफा, सरदार चौक, सुकेणकर लेन, ढिकलेनगर, गुरुद्वारा रोड, निमाणी बस स्टॅण्ड, वाल्मिकनगर, संजयनगर, बुरडवाडी, वाघाडी परिसर, आरपी विदयालय परिसर, श्रीराम विदयालय परिसर इ. ठिकाणचा शनिवार दि. 17/09/2022 रोजीचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे याचे आवाहन करण्यात येत आहे.

नाशकात निघाला होता हंडा मोर्चा

नाशकातील धरणे शंभर टक्के भरली गेली असताना सातपूर विभागात नागरिकांना पिण्यासाठी वणवण करावी लागत होती. त्यामुळे भाजप नेते दिनकर पाटील यांच्या नेतृत्वात परिसरातील नागरिकांनी महापालिकेवर हंडा मोर्चा आंदोलन केले होते.