बॉम्बस्फोटाने मुंबई हादरवणाऱ्या दहशतवाद्याची कबर कोणी सजवली..?

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील (Mumbai Bomb Blast) दोषी याकुब मेमनच्या (Yakub Meman) कबरीला सुशोभित करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आल्याचे दृश्य समोर आले होते. फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आली होती. ही जागा ‘बेरियल वक्फ बोर्डा’च्या अख्यत्यारीत येते. दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभिकरण केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर संतापाची लाट पसरली आहे. एका दहशतवाद्याला एवढी व्हीआयपी ट्रीटमेंट का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ही बातमी सर्वत्र आगीसारखी पसरल्यानंतर याकुबच्या कबरीवरील एलईडी लाईट्स पोलिसांनी काढून टाकल्या असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांच्या एका पथकानं काल रात्रीच मरीन लाईन्सच्या बडा कब्रस्तानमध्ये जाऊन वस्तुस्थिती तपासल्याचीही माहिती मिळतेय. तर महापालिकेचे अधिकारीही कब्रस्तानमध्ये जाऊन पाहणी करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईच्या गुन्हेगाराच्या कबरीवर सजावट करणाऱ्यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.

शब ए बारातला संपुर्ण दफनभूमीला रोषणाई करण्यात येते. त्यामुळे याकुबच्या कबरीवरच्या रोषणाईचा फोटो जुना असू शकतो अशी शक्यता बडा कब्रस्तानचा कर्मचारी अशफाक अहमदनं दिली आहे. दरम्यान मुंबईला रक्तबंबाळ करणाऱ्या याकुबचं स्मारक बनतंय का? देशाच्या दुश्मनाचं उदात्तीकरण कशासाठी? ज्याला १९९३ च्या स्फोटात दोषी ठरवण्यात आलं, त्याला हिरो बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे का ? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

१९९३ चा मुंबई बॉम्बस्फोट

१२ मार्च हा दिवस मुंबईकरांसाठी काळा दिवस म्हणावा लागेल. कारण या दिवशी १२ मार्च १९९३ ला मुंबईत १२ ब्लास्ट झाले होते. संपुर्ण देशाला हादरुन देणारा हा दिवस होता. देशातील हा सर्वात मोठा बॉम्बस्फोट म्हणावा लागेल. या हल्लात २५७ जणांचा मृत्यू झाला होता तर सातशे पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. या हल्ल्याच्या कटू आठवणी आजही अंगावर काटा आणतात.

१२ तारीख १२ हल्ले..!

१२ मार्चला दुपारी मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीबाहेर दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी देशाला हादरवणारा पहिला बॉम्बस्फोट झाला. स्फोट झालेल्या ठिकाणी जवळपास २ हजार लोकांची गर्दी होती. बेसमेंटच्या पार्किंगमध्ये आरडीएक्सनी भरलेल्या एका कारमध्ये हा स्फोट झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजबाहेरील या स्फोटात ८४ लोकांचा मृत्यू आणि २०० हून अधिक लोक जखमी झाले होते. दुसरा स्फोट : दुपारी २.१५ वाजता, नरसी नाथ स्ट्रीट तिसरा स्फोट : दुपारी २.३० वाजता, शिवसेना भवन चौथा स्फोट : दुपारी २.३३ वाजता, एयर इंडिया बिल्डिंग पाचवा स्फोट : दुपारी २.४५ वाजता, सेंच्युरी बाजार सहावा स्फोट : दुपारी २.४५ वाजता, माहिम सातवा स्फोट : दुपारी ३.०५ वाजता, झवेरी बाजार आठवा स्फोट : दुपारी ३.१० वाजता, सी रॉक हॉटेल नववा स्फोट : दुपारी ३.१३ वाजता, प्लाझा सिनेमा दहावा स्फोट : दुपारी ३.२० वाजता, जुहू सेंटॉर हॉटेलअकरावा स्फोट : दुपारी ३.३० वाजता, सहार विमानतळ बारावा स्फोट : दुपारी ३.४० वाजता, विमानतळ सेंटॉर हॉटेलया स्फोटातील एक दोषी याकूब मेमन होता. त्याला नागपूर येथील मध्यवर्ती तुरुंगात फासावर लटकवले होतं.