नाशकात पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी

नाशिक । प्रतिनिधी
पत्नीनेच पतीची हत्या करण्यासाठी एक लाख रुपयांची सुपारी देऊन त्याला यमसदनी धाडल्याचे नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हेशाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात पत्नीसह बांधकाम व्यावसायिक, इडली- डाेसा विकणाऱ्या अण्णासह सात जणांना अटक करण्यात आली आहे.

सचिन श्यामराव दुसाने (३० रा. गणेशनगर, निफाड) असे मृत पतीचे नाव आहे. त्याचा मृतदेह पेठ येथे आढळला हाेता. तर दत्तात्रय शंकर महाजन (४३, बांधकाम व्यवसाय, रा. गणेशनगर, निफाड), संदीप किटटू स्वामी (३८, इडली डोसा विक्रेता, सिडको), अशोक मोहन काळे (३० मजुरी रा. कारगिल चौक, दत्त नगर, चुंचाळे),

गोरख नामदेव जगताप (४८, धंदा रिक्षाचालक, रा. दुर्गादेवी मंदिराजवळ, राणा प्रताप चौक, सिडको), पिंटू मोगरे उर्फ बाळासाहेब मारुती मोगरे (३६ रा. निफाड), मुकरम जहिर अहेमद शहा (२६ रा. विराट नगर, अंबड आयटीआय लिंक रोड) व शोभा सचिन दुसाने (मृताची पत्नीे, वय ३० रा. गणेशनगर, निफाड) अशी सुपारी घेणाऱ्या संशयितांची नावे आहेत.

या प्रकरणात खुनाच्या सुपारीची एक लाखांची रक्कम व माेबाईल, कार असा लाखाेंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.