२० वर्षापासून कंपनीत कामाला; बदली झाली, नैराश्यातून ७ जणांचे विष पिऊन…

मध्यप्रदेशातील इंदूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एकाच कंपनीतील ७ कर्मचाऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे. मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील परदेशीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच कंपनीत काम करणाऱ्या सात कर्मचाऱ्यांनी अचानक ट्रान्सफर केली म्हणून एकाच वेळी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी सांगितले की, आत्महत्येचा प्रयत्न करणारे सातही जण २० वर्षांपासून एकाच कंपनीत काम करत होते. कंपनीची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली होती. त्यामुळे कंपनीच्या संचालकांनी या सात कर्मचाऱ्यांची बदली दुसऱ्या कंपनीत केली. त्यामुळे सातही जण नैराश्यात गेले होते. या कर्मचाऱ्यांनी कंपनीत जात गोंधळ घातला. आम्ही विष प्यायलो आहोत, अशी माहिती त्यांनी कंपनीच्या संचालकांना दिली.

आम्ही जिवाचं बरंवाईट करणार आहोत, असे या कर्मचाऱ्यांनी संचालकांना सांगितले. याबाबतची माहिती कंपनीच्या संचालकांना मिळाली. त्यांनी याबाबत तातडीने परदेशीपुरा पोलीस ठाण्याला कळवले. घटनेची माहिती मिळताच परदेशीपुरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सातही कर्मचाऱ्यांना तातडीने उपचारासाठी एमवाय हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे उपचार केले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

कंपनीची आर्थिक परिस्थिती दयनीय आहे. सात-आठ वर्षांपासून कंपनी तोट्यात आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनीला कोणतेच काम मिळत नाही. त्यामुळे कंपनीच्या मालकाने कंपनीतील या कर्मचाऱ्यांची बदली सांवेर रोड स्थित दुसऱ्या कंपनीत केली होती. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे.दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी प्रकृती आता स्थिर आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत, अशी माहितीही पोलिसांनी दिली.