काल संत्री तर आज हातात बोके घेऊन विरोधकांच्या घोषणा !

Nagpur Winter Session 2022 : विधिमंडळ अधिवेशनाच्या (Nagpur Winter Session 2022) दुसऱ्या आठवड्यातील चौथ्या दिवसाचं कामकाज सुरु आहे. दरम्यान आजही विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली आणि सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्र घेतला. काल संत्रे तर आज खोके घेऊन विरोधकांनी पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली.

“हकालपट्टी करा, हकालपट्टी करा.. भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करा”, “शेतकऱ्यांना धोका, मंत्र्यांना खोका”, “विदर्भाला धोका, मंत्र्यांना खोका”, “महाराष्ट्राला धोका… मंत्र्यांना खोका”, “शेतकरी हैराण, सरकार खातो गायरान”, “सीमावासी हैराण.. सरकार खातो गायरान” या घोषणांनी विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला. तर हातात टेलीबर्डचे बोके आणि रिकामे खोके घेऊन सरकारचा निषेध केला.

५० खोके, माजलेत बोके, हकालपट्टी करा, हकालपट्टी करा, भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करा..विरोधकांच्या घोषणा

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक एकवटले, परिसर घोषणांनी दणाणला

अजित पवार यांचीही घोषणाबाजी, शिवसेनेचे आमदारही होते उपस्थित

काल संत्रे तर आज खोके घेऊन विरोधकांनी पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी

विरोधकांच्या हातात टेलीबर्डचे बोके आणि रिकामे खोके

या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नाना पटोले, भास्कर जाधव, धनंजय मुंडे, रोहित पवार, यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड, सचिन अहीर, विकास ठाकरे यांच्यासह सर्व विरोधी पक्षाचे आमदार सहभागी झाले होते. हे आम्ही खोके आणि बोके घेऊन प्रतिकात्मक आंदोलन केले असल्याचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

काल संत्री तर आज खाली खोके हातात घेऊन विरोधकांनी “हकालपट्टी करा, हकालपट्टी करा.. खोकेवाल्यांची हकालपट्टी करा..” म्हणत सत्ताधाऱ्यांना सरकारचा निषेध केला. हातात टेलीबर्डचे बोके आणि रिकामे खोके घेऊन घेऊन विरोधकांनी परिसर दणाणून सोडला होता.

नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीचे आमदार पायऱ्यांवर आले होते. तर दुसरीकडे सत्ताधारी आमदारही आपल्या पक्ष कार्यालयातून महाविकास आघाडी विरोधात घोषणा देत माध्यमांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून हे चित्र दिसले नाही. याऊलट सत्ताधारी आमदार शांत असल्याचे पाहायला मिळाले.