बॅनर लावताना पाचव्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी
इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशकात घडली.

अशपाक नगीनेवाले असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत प्राथमिक माहिती अशी की, अशपाक हा बॅनर लावण्यासाठी गेला इमारतीवर गेला होता. मात्र त्याचा तोल गेल्याने पाचव्या मजल्यावरून खाली पडला. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान या तरुणाच्या मृत्यूनंतर हॉस्पिटल परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणाव निवळला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.