येवल्यात नायलॉन मांजाने कापला तरुणाचा गळा

येवला | पांडुरंग शेळके
जिल्ह्यातील येवला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव साजरा केला जातो परंतु याच पतंगोत्सवला नायलॉन मांजा ची नजर लागली आहे. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी याच नायलॉन मांजाने गळा कापला आहे.

मकरसंक्रातीच्या निमित्ताने शहरात पतंगोत्सव सुरू आहे. दरम्यान आज रस्त्यावरून जात असणाऱ्या दुचाकी स्वार तरुणाच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकल्याने मोठ्या प्रमाणात गळा कापला आहे. कुमार मेघे अस या तरुणाचे नाव आहे. या तरुणाच्या गळ्याला तब्बल २० टाके पडले असून गंभीर जखमी झाला आहे. या तरुणावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून डॉ. चंडालिया हे उपचार करीत आहेत.

नायलॉन मांजा विक्रीसाठी बंदी असतांना देखील सर्रासपणे विकला जात आहे. याकडे पोलिस यंत्रणांचे लक्ष नसल्याकारणाने असे प्रकार होत आहे. अशी भावना सामान्य येवलेकर व्यक्त करत आहे.

दरम्यान नायलॉन मांजा चा तात्काळ बंदोबस्त करून दोन दिवस तरी आनंदाने पतंग उत्सव साजरा व्हावा अशी अपेक्षा सामान्य येवलेकर करत आहे. अशा घटनांमुळे प्रसिद्ध असलेल्या पतंग उत्सवाला गालबोट लागत आहे.