नाशिक जिल्ह्यातील १५६ गावे इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये

नाशिक । प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने नाशिक परिक्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील १५६ गावांचा समावेश इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये करण्यात आला आहे. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील काही भाग संरक्षित करण्याचा निर्णय केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने घेतला आहे.

नाशिक जिल्हा हा जैवविविधतेने नटला आहे. यातील त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, इगतपुरी आदी आदिवासी भागाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. त्यामुळे येथील डोंगररांगांमधील जैववैविध्य जपले जावे, इथल्या संस्कृतीचा वारसा जपला, जैवविविधता वाढीस लागावी यासाठी या तालुक्यातील काही भाग पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अर्थात ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, कळवण, सिन्नर. बागलाण, इगतपुरी, दिंडोरी तालुक्यातील काही गावांचा समावेश यात आहे. या निर्णयानुसार वृक्षतोड, खाणकाम , मोठे बांधकाम इत्यादी गोष्टींवर निर्बंध आणले आहेत.

या कामांना परवानगी नाही
सर्व प्रकारच्या बांधकामांना मनाई, वीटभट्ट्या, दगडखाणींनाही परवानगी नाकारण्यात येणार आहे. शिवाय रेल्वे, पूल, रस्तेबांधणीसह जलविद्युत पूल, रस्तेबांधणीसह जलविद्युत प्रकल्पांसह निसर्ग पर्यटनांसाठी आवश्यक हॉटेल, रिसॉर्ट यांच्यासाठी कडक नियमावली लागू करण्यात येईल. तसेच नव्या बांधकाम प्रकल्पांना सरसकट मनाई आहे.

विशेष समितीची स्थापना
राज्यातील पश्चिम घाट क्षेत्रांत परिसंवेदनशील सीमा ठरविण्यासाठी तसेच प्रस्तावित इको-सेन्सेटिव्ह झोनवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावनिहाय व राज्यनिहाय एक समिती गठीत एक समिती स्थापन करण्यात आली आहे. संबंधित गावाचे सरपंच, स्थानिक वनरक्षक, कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक आदींचा समावेश आहे.

या गावांचा समावेश
त्र्यंबकेश्वर : चिंचओहोळ, खडकओहोळ, बेहेडपाडा, कडेगहाण, हातलोंढी, ओझरखेड, बेरवळ, चिंचवड, महादेव नगर, रायते, बेलपाली, वायघोळपाडा, जातेगाव ब, मुलवड, राऊतमाळ, वरसविहीर, वटकपाडा, देवळा, नांदगाव, मेटकावरा, वेळुंजे, अंबई, चाकोरे, मेटघर किल्ला, हर्षेवाडी, उंबरने, टाकेहर्ष, पाहीन, टाके देवगाव,येळ्याची मेट.

सुरगाणा : गोंडुने, पांगारने, पिंपळसोड, वांगन, मालगोंदे, सुंदरबन, मोहपाडा, गुही जांभूळपाडा, करंजुल सुरगाणा, विजयनगर, खुंटविहीर, गलबारी, रानविहीर, श्रीरामपूर, उदळदारी, राश, डोल्हारे, काठीपाडा, आमझर, वाळूतझिरा, श्रीभुवन, करवंन्दे, मोठमाळ, वंगणसुळे, पातळी, बेंडवळ, भवाडा, उंबरदे, वाघाडी, करंजुल, कोटंबा, मेरदांड, डांगराळे, पिलूकपाडा, मुरुमदारी, उंडोहाळ, वारंभे, भेंशेत, खोबळे डिगार, खोकरविहीर, खिर्डी, कहांडोळपाडा.

पेठ : आंमडोंगरा, सादडपाडा, गांडोळे, कापूरने, कायरे, दाभाडी, कुंभाळे, लव्हाळी, बेलपाडा,गारमाळ, अंधरूटे, तोंडवळ, चाफ्याचापाडा, आंबापानी, कहांडोळपाडा, कासटविहीर, खडकी, उंबरद, बोरपाडा, जांभूळमाळ, नाचलोंढी, मुरूम हट्टी, गुळवंच.

इगतपुरी : धारगाव, वाळविहीर, ट्रिंगलवाडी, चिंचले खैरे, भंडारदरावाडी, मांजरगाव, कुरुंगवाडी, जामुंडे.