अवघ्या दोन सेंकदात चैन स्नॅचिंग करीत चोरटे पसार

नाशिक । प्रतिनिधी
बेलतगव्हाण येथून रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना काल (दि. २४) रात्रीच्या सुमारास घडली आहे. तसेच सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.

https://youtu.be/7V3j_BH3_6o

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बुधवारी रात्री आपल्या नातलगांबरोबर येथील महिला कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. काम आटोपून घरी परतत असतांना दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी गाडीचा वेग कमी करून या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून नेली.

सदर प्रकार हा सीसीटीव्हीत कैद झाल्याने नाशिकरोड पोलीस याचा तपास करीत आहेत.