Home » UnionBudgetLive : ‘पीएम आवास योजनेसाठी ४८ हजार कोटी, आणखी बरच काही..!

UnionBudgetLive : ‘पीएम आवास योजनेसाठी ४८ हजार कोटी, आणखी बरच काही..!

by नाशिक तक
0 comment

नवी दिल्ली । प्रतिनिधी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022 ) सादर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. कोरोना संसर्गाच्या काळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे.

शेती आणि ग्रामीण उद्योगांसाठी नाबार्ड निधी
शेती आणि ग्रामीण उद्योगांसाठी स्टार्टअप्सना वित्तपुरवठा करण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल, जे कृषी उत्पादन मूल्य साखळीसाठी संबंधित आहे. स्टार्टअप्स एफपीओला समर्थन देतील आणि शेतकऱ्यांना तंत्रज्ञान पुरवतील.

पीएम आवास योजनेसाठी ४८ हजार कोटी
पीएम आवास योजनेसाठी ४८ हजार कोटींची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ८० लाख नवीन घरे बांधण्यात येणार आहेत.

पोस्ट ऑफिस-बँक लिंक करणार
पोस्ट ऑफिस-बँका एकमेकांशी जोडल्या जातील. याद्वारे आपापसात पैशांची देवाणघेवाण होऊ शकते. २०२२ मध्ये पोस्ट ऑफिसमध्ये कोअर बँकिंग सुरू केली जाईल.

२०२२ मध्ये 5G मजबूत इकोसिस्टम तयार

२०२२ मध्ये खाजगी दूरसंचार प्रदात्यांद्वारे 5G मोबाइल सेवांच्या रोलआउटसाठी आवश्यक स्पेक्ट्रम लिलाव आयोजित केला जाईल. “पीएलआय योजनेचा एक भाग म्हणून 5G साठी मजबूत इकोसिस्टम तयार करण्यासाठी डिझाइन-लेड मॅन्युफॅक्चरिंगसाठी योजना सुरू केली जाईल.”

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!