राज ठाकरेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण.. आजची शस्त्रक्रिया पुढे ढकलली

मुंबई | मनसेप्रमुख (MNS chief) राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पुन्हा एकदा कोरोनाची (corona) लागण झाल्याचे समोर आले आहे. राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याने आज त्यांच्यावर होणारी पायाची शस्त्रक्रिया (surgery) पुढे ढकलण्यात आली आहे. खूप दिवसांपासून राज ठाकरे यांना पायाचा त्रास होत असल्याने, त्यांच्या पायावर आज शस्त्रक्रिया होणार होती. पण कोविड डेड सेल्स मुळे अनेस्थेशिया (Anasthatia) (भूल) देऊ शकत नसल्याने मुंबईतील (Mumbai) लीलावती रुग्णालयातील (Leelavati hospital) डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

राज ठाकरे यांनी तीन-चार दिवसांपूर्वी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पक्षाच्या पदाधिकारी तसेच नेत्यांची बैठक घेतली होती. आगामी महापालिका निवडणुकींच्या (Municipal Corporation Election) संदर्भात त्यांनी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करत त्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानंतर काल ते शस्त्रक्रियेसाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी २४ तास अगोदर काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यात कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (positive) आल्याने त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. आता त्यांना उपचार करून दवाखान्यातून डिस्चार्ज (dischearge) देण्यात आला आहे. काही दिवसांनी पुन्हा एकदा त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार असून, त्यानंतर त्यांच्या शस्त्रक्रिया संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.

पायाच्या दुखाण्यामुळेच अयोध्या दौरा रद्द ….. गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे यांना पायाचा त्रास सुरु आहे. या पायाच्या त्रासामुळेच त्यांनी आपला ५ जून रोजीचा नियोजित अयोध्या (Ayodhya) दौरा रद्द केला होता. पुणे (Pune) येथील जाहीर सभेतही त्यांनी या त्रासाबद्दल उल्लेख केला होता आणि अयोध्या दौरा रद्द करण्याचे कारणही स्पष्ट केले होते. तसेच या सभेतच त्यांनी १ जूनला शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार, आज होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते.

या अगोदरही कोरोनाची लागण …… राज ठाकरे यांना या अगोदरही ऑक्टोबर २०२१ (October 2021) मध्ये कोरोनाची (corona) लागण झाली होती. त्यांना त्यावेळीही उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.