त्या सुफी बाबाचा मृतदेह आज मूळगावी होणार रवाना

अफगाणिस्तानातील नागरिक असलेले मुस्लिम धर्मगुरू जरीफ अहमद सय्यद चिस्ती यांची मागच्या पंधरवड्यापूर्वी नाशिकच्या येवला तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती .त्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत चौघा संशयिताना बदलापूर मधून ताब्यात घेतले आहे. यानंतर आता झरिफ चिस्ती बाबाचा मृतदेह मूळ गावी रवाना होत आहे. मुंबई मार्गे अफगाणिस्तान जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे आज सुफी बाबाचा मृतदेह दिल्लीला जाणार आहे अशी देखील माहिती मिळाली आहे.

झरिफ बाबांच्या अंत्यविधीचा प्रश्न पोलिसांसमोर उभा टाकला होता. आता बाबाच्या मृतदेहाच्या दफनविधीसाठीचा तिढा सुटला आहे. मृतदेह आता त्यांच्या मूळ गावी अफगाणिस्तानात घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. अंत्यविधीसाठी अफगाणी दूतवासाशी संपर्क साधण्यात आला आहे तोपर्यंत मृतदेह हा जिल्हा शासकीय रुग्णालय सुरक्षित जतन करून ठेवण्यात आलेला आहे.

बाबांच्या दफनविधीबाबत अफगाणिस्तान दूतावास कार्यालयाकडून पोलिसांना ठोस असा ग्रीन सिग्नल मिळत नव्हता अफगाणिस्तानचे नागरिक असल्यामुळे त्यांचा दफनविधी करण्यासाठी दूतावास कार्यालयाकडून प्रक्रिया पार पडणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले होते अफगाणिस्तानातून भारतात येण्यासाठी बाबांचे वडील किंवा अन्य कुटुंबीयांना व्हीसा मिळत नसल्याने त्यांचाही मार्ग बंद झाला आहे.