ऋषभ पंतच्या तपासणीनंतर एक बॅड न्यूज आली समोर

अपघातग्रस्त झालेल्या स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत याला आता मुंबईच्या कोकीलाबेन रुग्णालयात शिफ्ट केले आहे. या आधी त्याच्यावर देहरादून येथील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. दोन दिवसांपूर्वी अधिक चांगल्या उपचारांसाठी ऋषभ पंतला मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान त्याची तपासणी केल्यानंतर एक निराशाजनक बातमी समोर येत आहे.

ऋषभ सह त्याच्या चाहत्यांसाठी देखील ही बातमी वाईट आहे. कारण त्याला तपासल्यानंतर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ऋषभला मैदानावर पुन्हा परतण्यासाठी ८ ते ९ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यानुसार आता ऋषभला फक्त केवळ आयपीएल फेस्टिवलच नाही तर आगामी वनडे वर्ल्ड कप २०२३ देखील खेळता येणार नाही. त्याला या सामन्यांना मुकावे लागणार आहे.

ऑक्टोबर २०२३ मध्ये वनडे वर्ल्ड कप होणार आहे. दरम्यान ऋषभ वर सुरु असलेलाउपचार पाहता ऋषभची सूज जो पर्यंत उतरणार नाही, तो पर्यंत एमआरआय किंवा सर्जरी करता येणार नाही, असे डॉक्टरांचे त्यांचं मत आहे. ऋषभच्या लिगामेंटला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला मैदानावर कमबॅक करण्यासाठी ८ ते ९ महिने लागू शकतात, असे डॉक्टर म्हणाले आहे. अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे ऋषभ आणि क्रिकेटप्रेमींसाठी ही बॅड न्यूज आहे.

३० डिसेंबर २०२२ ला दिल्ली-डेहराडून हायवेवर ऋषभच्या कारला भीषण अपघात झाला होता. त्याची कार पूर्णपणे जाळून खाक झाली होती. हा अपघात अत्यंत भयावह होता. अपघाताची दृश्य त्याची भीषणता सांगत होते. सुदैवाने ऋषभ या अपघातातून बचावला. मात्र त्यात त्याला गंभीर मार लागला आहे. आधी त्याच्यावर डेहराडून येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी अधिक चांगल्या उपचारांसाठी ऋषभला मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आले.

ऋषभच्या अपघातामुळे संपूर्ण क्रिकेट जगतात खळबळ उडाली होती. त्याचे चाहते तसेच क्रिकेट विश्वातील दिग्गज देखील त्याच्यासाठी प्रार्थना करत होते. सुदैवाने ऋषभ डोक्यातून बाहेर निघाला मात्र त्याच्या या अपघाताचा परिणाम त्याच्या येत्या खेळांच्या संधीवर होत आहे. २ मोठे सामने म्हणजे आयपीएल आणि वर्ल्डकप ऋषभला खेळता येणार नाही. असा अंदाज व्यक्त होत असला तरी मात्र ऋषभच्या बरे होण्यासाठी प्रार्थना सुरु आहे. तो लवकरच बरा होऊन पुन्हा क्रिकेट च्या मैदानावर आपली जादू दाखवेल आणि चाहत्यांची माने जिंकेल अशी आशा सर्वांनाच लागलेली आहे.