नाशकात धनेधर टोळीचा धुडगूस, सतरा गुंडांवर ‘मोक्का’

नाशिक । प्रतिनिधी

शहर आणि परिसरात सातत्याने गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या गुन्हेगारांवर नाशिक पोलिसांनी गांभीर्याने लक्ष केंद्रीत केले असून १७ गुंडांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता, पोलीस आयुक्त दीपक पांडये पुन्हा एक्शन मोड वर आले असून पुन्हा गुंडांना चाप बसणार आहे. दरम्यान शहरात दहशत माजवणाऱ्या धनेधर टोळीची धरपकड सुरू केली आहे. या टोळीने शहरात धुडगूस घातला असून तलवार, कोयत्या सारख्या शस्त्रांचा धाक दाखवत खंडणी वसूल केली जात आहे.

याच टोळी विरोधात 46 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे नाशिक पोलिसांनी शहरातील १७ गुंडांवर मोक्काची कारवाई केली आहे. त्यामुळे आता गुन्हेगारांना चांगलाच जरब बसणार आहे.