दिल्लीवरून आदेश आला की काही नसलं तरी कारवाई होते!

नाशिक । प्रतिनिधी
राज्यात कारवाई करायची म्हटली तर मटेरिअल महत्वाचे नाही, दिल्ली वरून आदेश आला की काही नसलं तरी कारवाई होते, असा खोचक टोला पालकमंत्री भुजबळ यांनी विरोधकांना लगावला आहे.

खासदार संजय राऊत यांच्या वादळी पत्रकार परिषदेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे किरीट सोमैय्या, नारायण राणे चांगलेच पेटून उठले आहेत. यावर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देखील चांगलीच आगपाखड केली आहे. ते म्हणाले आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असून आनंदाचे वातावरण त्यामुळे आज पत्रकार परिषद झाली नसती तर बरं झालं असत. मात्र राजकीय क्षेत्रातील विरोधक एकही दिवस टीका करायचा सोडत नाही. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून कणखर उत्तर दिलं, एक दोन माणस आकख्या राज्यात आरोप करत फिरत होते, असा टोला त्यांनी लगावला.

तर राणेच्या वक्तव्यासंदर्भात ते,म्हणाले, राणे म्हणाले तशी परिस्थिती नाही, त्यांचे आणि माझे सीए वेगळे आहेत, त्यांच्या सीए चा आमच्या सीएशी संबंध नाही, तर राज्यात कारवाई करायची म्हटली तर मटेरिअल महत्वाचे नाही, दिल्ली वरून आदेश आला की काही नसलं तरी कारवाई होते, अन दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक आपल्या पार्टीत येणार म्हटल्यावर, ‘इनको छोड दो’ असा उलटा संदेश येतो, असेही ते म्हणाले.