अभिनेत्री शिल्पा शेट्टी सप्तशृंगी देवी चरणी लीन

नाशिक । प्रतिनिधी

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रासोबत वणी गडावर पोहोचली आहे. त्यानंतर साडे तीन शक्तीपिठापैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी देवी चरणी लिन झाली. यावेळी देवीचे दर्शन घेत पूजा करीत शिल्पा शेट्टीने आपल्या पतीसह आई सप्तशृंगीच्या चरणी कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा चर्चेत आहेत. राज कुंद्रा बाहेर आल्यानंतर विविध ठिकाणच्या देवी दर्शन करताना सोशल मीडियातून दिसले आहे. नुकतेच त्यांनी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले आहे. यावेळी शिल्पा शेट्टीला मंदिरात पाहून तिच्या चाहत्यांनीही तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली.

दरम्यान गडावर आल्यानंतर शिल्पा शेट्टीस मास्कमुळे कोणी ओळखले नाही. मात्र नंतर लक्षात आल्याने तिच्याभोवती गराडा झाला. यावेळी कोरोनाचे सर्देव नियम पळून दोघांनी देवीचे दर्वीशन घेतले. दर्शनानंतर मंदिर प्रशासनाने शिल्पाचा सत्कार करीत सन्मान केला.

अलीकडे बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रामुळे चर्चेत आली होती. पॉर्न फिल्म प्रकरणात अडकलेला राज कुंद्रा या प्रकरणामुळे तब्बल दोन महिने तुरुंगात होता. बराच काळ तुरुंगात घालवल्यानंतर अखेर त्यांना सप्टेंबरमध्ये जामीन मिळाला. मात्र, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो शिल्पा आणि कुटुंबियांसोबत त्यांनी विविध ठिकाणी जात दर्शन घेतले आहे.