जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकांचा धुरळा, प्रशासन सज्ज

नाशिक । प्रतिनिधी
पेठ नगरपंचायत निवडणूक २०२१ चे मतदान २१ डिसेंबर रोजी होत असून याकरिता प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून नियोजित मतदान केंद्रावर पेट्या पोचल्या जाणार आहे त्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

पेठ नगरपंचायत निवडणुकीसाठी एकूण १७ मतदान केंद्र असून करिता १०७ कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. पेठनगर पंचायत निवडणुकीसाठी झोनल ऑफिसर दोन, मतदान केंद्राध्यक्ष २१ ,मतदान अधिकारी ६६ ,मतदान कर्मचारी २१, वाहने सात, एकूण मशीन २९ अशी प्रशासनाच्या वतीने प्रशासकीय यंत्रणेची तयारी झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील सहा ठिकाणी नगरपंचायतीसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी १९ जानेवारी रोजी होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने चोख तयारी केली आहे.

जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, देवळा, दिंडोरी, निफाड या सहा ठिकाणी नगरपंचायत निवडणूक होत आहे. या सहा नगरपंचायतीच्या ८७ जागांसाठी २९२ उमेदवार रिंगणात असून उद्या जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत.