397
नाशिक | प्रतिनिधी
सायखेडा परिसरात किरकोळ कारणातुन झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाल्याने दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. निफाड तालुक्यातील ही घटना आहे.
अधिक माहिती अशी की, सायखेडा येथील मार्केटच्या भिंतीवर गौऱ्या बनवण्याच्या व्यवसाय महिला करतात. यावेळी किरकोळ विषयावरून दोन महिलांमध्ये बाचाबाची होत असतांना ज्ञानेश्वर जाधव हा तेथे वाद मिटविण्यासाठी गेला असता योगेश देवकर याने जाधव यांच्या डोक्यात हातोडीने वार केले.
या घटनेत दोघेजण गंभीर जखमी असून जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घडलेल्या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक शहरासह आता ग्रामीण भागातही गुन्हेगारीने डोके वर काढल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.