मंत्रीपदावरून आ.शिरसाठानंतर भरत गोगावले पण नाराज तर नाही ना?

मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल अशी अनेकांना आस लागलेली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा पहिल्या टप्प्यातील विस्तार आटोपला मात्र त्यावर त्यांचेच अनेक जण नाराज असल्याचे निदर्शनास आले होते. त्यात नाराजांमध्ये शिरसाठ आघाडीवर होते. आणि आता त्यात भरतशेठ गोगावले पण नाहीत ना अश्या चर्चांना उधान आले आहे. “पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात माझे नावं होते. मात्र, काही नेत्यांनी मंत्रिपदाची मागणी केल्यामुळे माझे नाव मागे घेण्यात आले”. असे गोगावले यांनी सांगितले त्यामुळे त्यांचे पहिल्या टप्प्यातील मंत्रिपद हुकले याची खंत तर नाही ना अश्या चर्चाना उधान आले आहे.

पहिला टप्पा ओलांडला दुसरा जातोय अवघड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर तब्बल ३९ दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. लवकरच दुसरा टप्पा पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारादरम्यान, शिंदे गटात नाराजीचे सुर पाहायला मिळाले. ज्यांना मंत्रीपद मिळाले नाही त्यांना दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारात पद मिळणार असल्यीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मागील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री दोन वाजेपर्यंत बैठक झाल्याचे सूत्राने नमुद केले. या बैठकीत शिंदे गट व भाजपमधील काही आमदारांच्या नावावर चर्चा झाली. परंतु, खात्यावरून ही चर्चा निष्फळ ठरल्याचे समजते.

आ. भरतशेठ म्हणतात,

लवकरच मंत्रीमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात माझे नाव होते. मात्र, नंतर ते बाद करण्यात आले. मात्र, इतर एक दोन नेत्यांनी मंत्रिपदाची मागणी केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माझ्याकडे पाहिले. आणि सांगितले की, जेव्हा शिवाजी महाराज अडचणीत होते. तेव्हा तानाजी मालुसरे धावत आले होते. आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे, अशे तानाजी मालुसरे यांनी शिवाजी महाराजांना सांगितले होते. त्यावेळी मी म्हणालो की काही हरकत नाही. त्याच भूमिकेतील मी माणूस आहे. दापोलीमध्ये एका सभेच भरत गोगावले यांनी हा गौप्यस्फोट केला.

मंत्रिपदे

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना जड जाताना दिसतोय. मंत्रिपदे कमी आणि त्यासाठी इच्छुकांची यादी मोठी त्यामुळे कोणाला कोणाला खुश ठेवायचे आणि कोणाला नाराज करायचे यासाठी सरकारची तारेवरची कसरत सुरु आहे. त्यामुळे अद्याप मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे अश्या चर्चा आहेत.