सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री म्हणाले, हा तर पहिला टप्पा…

आज झालेल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत शिंदे गटाला दिलासा मिळाला असून, आता शिवसेना पक्ष चिन्ह कोणाचे हे निवडणूक आयोगाला ठरवता येणार आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यामुळे ठाकरेंना मोठा झटका बसला असून शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे.


काय म्हणाले मुख्यमंत्री?

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणले, आजचा निर्णय पहिला टप्पा आहे. पुढेही जे काही होईल ते नियमाप्रमाणे होईल. नियमाप्रमाणे जे निर्णय होतील त्यांचं आम्ही स्वागत करु. केंद्रीय निवडणूक आता योग्यरित्य निर्णय घेईल. आताच त्याच्यावर काही भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.


ठाकरे गट आणखी अडचणीत

शिंदे गटाला कोर्टाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोग पक्ष चिन्हाबाबत निर्णय घेऊ शकतो. याबाबत कोणतीही स्थगिती न देण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निर्णय आता निवडणूक आयोग घेणार आहे. शिवसेनेची स्थगिती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. खरी शिवसेना कोणती याचा निर्णय आता निवडणूक आयोग घेणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला आपली कागदपत्रे जमा करण्याचे निर्देश दिले होते. ही लढाई सर्वोच्च न्यायालयात असल्याने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. मात्र ती मान्य न झाल्यामुळे आता ठाकरे गट अडचणीत आला आहे.