Home » ‘तुझा पाच मिनिटात कार्यक्रम करतो’ अशी धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

‘तुझा पाच मिनिटात कार्यक्रम करतो’ अशी धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

by नाशिक तक
0 comment

नाशिक : शहरात रस्त्याने चालत असताना देखील महिला आणि मुली सुरक्षित नसल्याचे समोर येत आहे. विनयभंगाच्या २ घटना नाशिक शहरातून समोर आल्या असून रस्त्यात मुलींना अडवत त्यांचा विनयभंग करण्यात आला आहे. विनयभंगाची एक घटना नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत तर दुसरी घटना अंबड पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.

नाशिकमध्ये रस्त्यावरून अल्पवयीन मुलगी पायी जात असताना तिचा विनयभंग केल्याची घटना समोर येत आहे. संशयित अज्ञात दुचाकीस्वाराने त्याच्या दोन मित्रांसह येत तिला अडवले आणि विनयभंग केला आहे. विनयभंगाची घटना नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. या घटनेत ‘तुझा पाच मिनिटात कार्यक्रम करतो’, असे म्हणून संशयित आरोपीने सुरुवातीला तिला धमकी दिली आणि त्यानंतर अश्लील बोलून तिचा विनयभंग केला.

या घटनेबद्दल अधिक माहिती अशी की तक्रारदार पीडित पायी घरी जात असताना एका दुकानाजवळ तिच्या भावाच्या मित्राने त्याच्या दोन मित्रांसह मोटार सायकल वरून येऊन तिला अडवले. तिला बळजबरी गाडीवर बसून घेतले. दरम्यान तिला घरी न सोडता दुसरीकडे थांबवून ‘मी तुला पळवून पाच तुझा पाच मिनिटात कार्यक्रम करतो’, असे म्हणून धमकी दिली आणि अश्लील बोलून विनयभंग केला आहे. त्यासाठी नाशिक रोड पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधायक कलम ३६४, ५०६ (२) बाललैंगिक अत्याचार संरक्षण पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनयभांगाची दुसरी घटना अंबड पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. अंबड पोलीस ठाणे हद्दीत पिडीत तरुणी आणि तिची मैत्रीण दोघी किराणा घेण्यासाठी गेल्या असता, रस्त्यावर घराजवळ राहणाऱ्या एका इसमाने त्यांना अडवले. त्याने तक्रारदार मुलीला आणि तिच्या मैत्रिणीला लाज वाटेल अशा भाषेत बोलून विनयभंग केला आहे. त्यांना त्याने शिवीगाळ केली आणि दमदाटी देखील केली. तसेच मागे मागे फिरून त्यांचा पाठलाग केल्याची देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. तरुणीने त्यावेळी त्याच्याकडे दुर्लक्ष करत कायदेशीर तक्रार अंबड पोलीस ठाणे येथे दाखल केली आहे.

नाशिकमध्ये महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहे. घरात काय आणि रस्त्यावर चालताना काय सर्रास पणे महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेला तडा दिला जात आहे. वरील एका घटनेमध्ये एका अल्पवयीन मुलीचा देखील समावेश आहे. भर रस्त्यात बिनधास्तपणे अशा घटना घडत असल्यामुळे पोलिसांचा धाक गुन्हेगारांना उरला आहे की नाही..? असाच सवाल उपस्थित होत आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!