नाशिक :- आदिवासी समाजाच्या(Tribal society) आरक्षण कोट्यातून धनगर समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये, या मागणीसाठी सर्व आदिवासी संघटनांनी रविवारी मुंबई आग्रा महामार्गावरील(mumbai aagra highway nashik) घोटी टोलनाका येथे आंदोलन केले होते. टोलनाक्याच्या दोन्ही लेनवर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत घोटी टोलनाका बंद पडला होता.
(toll plaza closed). यामुळे नाशिकहून मुंबई कडे जाणारी तसेच मुंबईहून नाशिक (nashik mumbai trafik)कडे येणारी वाहतुकीस अडथळा झाला होता. यावेळी आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष लकी जाधव(lucky jadhav) यांनी धनगर समाजाची (dhangar samaj)आदिवासी आरक्षणामध्ये घुसखोरी करू नये. आदिवासी समाजाच्या आरक्षणात कोणत्याही जातीची घुसखोरी करत असाल तर नेत्यांना रस्त्यावर फिरकून देणार नाही. असा इशारा लकी जाधव यांनी दिला.
आमदार हिरामण खोसकर यांनी ठाकूर कातकरी महादेव कोळी यांच्या आरक्षणाला हात लावता कामा नये अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. रविवार – सोमवार सुट्टी असल्याने महामार्गावर दोन्ही बाजूला मोठी वाहतूक होती. या आंदोलनाचा फटका वाहन चालक व प्रवाशांना बसला.
धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करू नये अशी मागणी करत आदिवासी क्रांती कारक ठाकर फाउंडेशन संघटनेने नांदगाव शहरातून मोर्चा काढून येथील हुतात्मा चौकात रस्ता रोको आंदोलन केले यावेळी आदिवासी क्रांतिकारक राया ठाकूर संघटनेचे तालुका प्रमुख रवींद्र फोडसे, उपाध्यक्ष ईश्वर पोकळे, सचिव मधुकर मेंगाळ, राधा पोकळे, काळु पोकळे, संजय गावंडे ,मधुकर गावंडे आदींसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.