गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला निफाड मध्ये दुर्दैवी घटना.

राज्यभरात आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला जात आहे. नाशिक मध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झालेली आहे. परंतु नशिक जिल्ह्यात गणेशउत्सावाला नवव्या दिवशी गालबोट लागले आहेत. नाशिकच्या निफाड तालुक्यात काल संध्याकाळी गणपती विसर्जना साठी गेलेला वीस वर्षीय तरुण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिकमध्ये सकाळपासूनच सार्वजनिक मंडळाकडून लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची जय्यत तयारी सुरू आहे. अशातच गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली. निफाड तालुक्यातील(nifad shirvade) शिरवडे वणी येथील युवक पाण्यात वाहून (youth drowned)गेल्याची दुर्दैवी घटना घडली.


शिरवाडे वणी(vani nashik) गावाजवळील पाचोरे वणी येथील नेत्रावती नदीत काल संध्याकाळी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली घटनेची माहिती मिळताच चांदोरी अग्निशमन दलाच्या जवानांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत बेपत्ता युवकाचा शोध सुरू होता मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने युवकाचा शोध लागला नाही. गणपती विसर्जन करण्यासाठी पिंपळगाव बसवंत(pimplagav basavant) चांदवड मार्गावरील शिरवडे वणी येथील राज उमेश वाघ हा पाचोरेवणी परिसरात आलेल्या नदीपात नेत्रावती नदी तिरी गेला होता.

यावेळी गणपती विसर्जन सुरू असताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाय घसरून नदीत पडला मात्र गेल्या तीन दिवसापासून नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरू असल्याने नद्यांना पूर आला आहे. यामुळे सदर युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला नाशिकसह राज्यभरात आपल्या लाडक्या गणरायाला मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणामध्ये निरोप दिला जात आहे. नाशिक शहरात आज सकाळी 11 वाजेपासून गणेश उत्सवाला सुरुवात झाली. त्यामुळे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे त्याचबरोबर कृत्रिम तलावांची सुविधा देखील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे गणेश भक्तांनी नदीपात्रात उतरू नये काळजीपूर्वक विसर्जन करावे असे आवाहन नाशिक प्रशासनाकडून(nashikmnc) करण्यात आले आहे.