नाशकात लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तगण सज्ज

नाशिक:- राज्यभरात आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला जात आहे. नाशिक मध्ये गणपती विसर्जन(Ganesha Immersion) मिरवणुकीला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झालेली आहे. नाशिकमध्ये सकाळपासूनच सार्वजनिक मंडळाकडून लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची जय्यत तयारी सुरू आहे. सकाळी अकरा वाजेपासून गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. गेल्‍या दहा दिवसांपासून राज्‍यात गणेशोत्‍सव मोठ्या धुमधडाक्‍यात सुरू आहे. मात्र, आज आपल्‍या लाडक्‍या बाप्‍पांना निरोप देण्‍याचा दिवस असल्‍याने गणेश मंडळांच्‍या विसर्जन मिरवणूका निघाल्‍या आहेत. संपूर्ण राज्‍यात भक्‍तीमय वातावरणासह तरुणाईचा जल्‍लोष दिसून येत आहे. जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीनेे ठिकठिकाणी विसर्जन स्थळी कृत्रिम तलाव तयार करण्‍यात आले आहेत. उत्‍सवाच्‍या काळात कोणताची अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्‍त नाशिक शहरात ठेवण्‍यात आला आहे.

नाशिक शहरातील वाकडी बारव येथून गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. या गणेश विसर्जन मिरवणुकीवर ७०सिसिटीव्ही सह ४ ड्रोनची करडी नजर आसणार आहे. पर्यावरणपुरकतेचा(envoirment) विहार करून नाशिक महानगरपालिकेने (nashik munciple corporation) ५६ कृत्रिम तलावांची(artificiale dam) निर्मिती केली आहे. कृत्रिम तलावाबरोबरच २७ नैसर्गिक तलावांची (natural dam)निर्मिती केली आहे. सोबतच स्वयसेवी संस्थानीही विसर्जन कुंड तयार केले आहे. मुख्य मिरवणूक मार्गांसाह नाशिकरोड सिडकोतील काही रस्त्यांवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

नाशिकसह राज्यभरात आपल्या लाडक्या गणरायाला मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणामध्ये निरोप दिला जात आहे. नाशिक शहरात आज सकाळी 11 वाजेपासून गणेश उत्सवाला सुरुवात झाली. त्यामुळे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे त्याचबरोबर कृत्रिम तलावांची सुविधा देखील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे गणेश भक्तांनी नदीपात्रात उतरू नये काळजीपूर्वक विसर्जन करावे असे आवाहन नाशिक प्रशासनाकडून(nashikmnc) करण्यात आले आहे.