अंबड परिसरात धमकी देत महिलेवर अत्याचार

नाशिक । प्रतिनिधी

पीडितेस ठार करण्याची धमकी देत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीरेंद्र कृष्णा सूर्यवंशी, (रा. काकडे महाराज आश्रम शाळेजवळ) असे त्याचे नाव आहे. मात्र अद्याप या संशयितास अटक केली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पीडित महिला हि अंबड येथील सोनाली वाईन शॉप जवळून पायी जात असताना संशयित हा गाडीवर आला. यावेळी त्याने पीडित महिलेस ठार करण्याची धमकी देत आनंद वाटिक इमारतीच्या मागे एक्स्लो पॉंईट दत्तनगर रूमवर घेऊन जाऊन
फिर्यादी यांचे इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले, असे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान या संशयितांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप संशयितास अटक करण्यात आली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. अधिक तपास वपोनी देशमुखयांच्यासह एपीआय शिंदे, पीएसआय पवार, महिला पीएसआय फडोळ हे करीत आहेत.